घरमुंबईमग पुन्हा येऊ नका आमच्याकडे - राज ठाकरे

मग पुन्हा येऊ नका आमच्याकडे – राज ठाकरे

Subscribe

'जे लोक काम करत नाहीत त्यांना वर्षानूवर्षे सत्ता देतात आणि जे काम करतात त्यांच्या नशिबी मात्र पराभव येतो, मग कोण काम करेल तुमच्यासाठी'?, असे खडेबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या शेवटच्या सभेत मतदारांना सुनावले आहेत.

‘जे लोक काम करत नाहीत त्यांना वर्षानूवर्षे सत्ता देतात आणि जे काम करतात त्यांच्या नशिबी मात्र पराभव येतो. मग कोण काम करेल तुमच्यासाठी’?, असे खडेबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या शेवटच्या सभेत मतदारांना सुनावले आहेत. एवढेच नाही तर काम न करणारी माणसे निवडून द्यायची आहेत का? मग द्या निवडून. पण, मग येऊ नका आमच्याकडे, असे देखील राज ठाकरे यांनी खडेबोल मतदरांना सुनावले आहेत. ‘एवढेच नाही तर ‘आईवडिलांनी जन्म दिला म्हणून जगायचे असेल तर असल्या लोकांचे नेतृत्व राज ठाकरेला करायचे नाही’, असे देखील राज ठाकरे यावेळी म्हणालेत. ‘सगळे जण प्रश्न सोडवायाल आमच्याकडे येतात. मग, प्रश्न सोडवत नाहीत त्यांना कसे मतदान करता’, असे म्हणत ‘जे काम करत आहेत त्यांना तुम्ही मतांची थाप द्या म्हणजे कामे अजून होतील’, असे राज ठाकरे यावेळी म्हणालेत. दरम्यान, मतदान करताना गेली पाच वर्षे कशी गेली ते विसरू नका, असे सांगत ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याकडे डोळे झाक करू नका आणि मतदान करा, असे आवाहन मतदारांना केले आहे. मनसेच्या उमेदवारंसाठी राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये सभा घेतली होती. यावेळी त्यांनी ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा देखील मुद्दा आपल्या भाषणात घेतला. मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न इतका गंभीर आहे की, लोकांना स्वत:चे हक्काचे घर सोडून भाड्याच्या घरात राहत आहेत. सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. फाईली नुसत्या पडून आहेत, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

‘आरे’ला कारे होत नाही म्हणूल हे चाललंय

‘एवढंच नाही तर आज मेडिकल आणि इंजिनीअरच्या अॅडमिशनचा विषय आहे. मुलांना अॅडमिशन देताना आपण जात का बघतो’, असे देखील राज ठाकरे म्हणाले. मात्र, हे सगळं तुमच्याकडून आरेला कारे होत नाही म्हणून होत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच आज अनेक तरुण-तरुणी नोकऱ्या शोधत आहेत. अरे पण कसल्या नोकऱ्या शोधत आहात त्या गेल्या कधीच्या, असे सांगत तरुणांनी जागे होण्याची गरज असल्याचे ते म्हणालेत. दरम्यान, निर्मला सितारामण यांनी स्वत: सांगितले की, महाराष्ट्रात पाच लाख नोकऱ्या गेल्या त्याचा सर्वाधिक फटका पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई, औंरंगाबाद या शहराला बसल्याचे सांगत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. तसेच मी कोत्या मनाचा नाही. सरकारने चांगले काम केले तर मी बोलेन, असे सांगत ३७० रद्द झाले तेव्हा अभिनंदन देखील मीच केलं होते, असे सांगत ३७० चा महाराष्ट्राच्या निवडणुकांशी काय संबंध, असा सवाल विचारला. एवढेच नाही तर ठाण्यामध्ये राहणाऱ्या माणसांना सांगा हक्काच्या घरात कधी जाणार आणि नंतर ३७० वर बोला असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – युती आहे ना; मग जेवणाच्या थाळीचा रेट वेगवेगळा का? – राज ठाकरे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -