घरमुंबईरणजितसिंह मोहिते-पाटलांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ घेतले हाती

रणजितसिंह मोहिते-पाटलांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ घेतले हाती

Subscribe

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याच्यासोबत त्यांच्या समर्थकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.

गेल्या काही दिवसापासून रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आले होते. अखेर त्यांन आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गरवारे क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. धैर्यशील मोहिते पाटील, वैष्णोदेवी मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात रंगत होत्या. अखेर त्यांच्या भाजपमधील प्रवेशावर शिक्का मोर्तब झाला आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याच्यासोबत त्यांच्या समर्थकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे माढ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोहिते-पाटील घराण्याचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दोन दिवसापूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -