घरमुंबईशाळा,कॉलेजांमधील स्वच्छतेबाबत एफएसएसआयकडून प्रशिक्षण

शाळा,कॉलेजांमधील स्वच्छतेबाबत एफएसएसआयकडून प्रशिक्षण

Subscribe

शाळा आणि कॉलेजांमधील अन्न स्वच्छ आणि खाण्यासाठी सुरक्षित असावं यासाठी अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून शाळा आणि कॉलेजांमधील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना योग्य ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

शाळा आणि कॉलेजांमधील अन्न स्वच्छ आणि खाण्यासाठी सुरक्षित असावं यासाठी अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून शाळा आणि कॉलेजांमधील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना योग्य ट्रेनिंग देण्यात येणार आहे. मुलांनी शाळेत किंवा कॉलेजमध्ये एक दिवस डबा नेला नाही की कॅन्टीनचा पर्याय त्यांच्याकडे असतो. शाळा आणि कॉलेजातील अनेक मुलं कॅन्टीनमधील अन्न खातात. त्यामुळे, कॅन्टीनमधील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. यानुसार, आता शाळा आणि कॉलेजांमधील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना योग्य ते ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

मार्चमध्ये देणार प्रशिक्षण –

मार्च अखेरीच्या अगोदर शाळा आणि कॉलेजांमधील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना हे ट्रेनिंग देण्याबाबतची माहिती अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने शिक्षण संस्थाना दिली आहे. याबाबतचं एफएसएसआयने अधिकृत ट्विट करुन कळवलं आहे. मुख्य म्हणजे या कर्मचाऱ्यांना एफएसएसएआयच्या अधिकृत प्रशिक्षकांकडून ट्रेनिंग देण्यात येणार आहे. शिवाय, अन्न सुरक्षा आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र नसून खाद्यपदार्थांची विक्री केल्यास २ लाख ते ५ लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

- Advertisement -
Schools and colleges have been asked to get food safety training done of their canteen operators by March.
अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मोहिम

यामध्ये कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना अन्न शिजवताना बाळगण्याच्या स्वच्छतेबाबत धडे दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून अन्नाच्या गुणवत्तेबाबत अभिप्राय देखील घेण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. एफएसएसएआयच्या म्हणण्यानुसार, अन्न सुरक्षा आणि मानकं कायदा २००६ नुसार, अन्न बनवणारी व्यक्ती किंवा त्यासंदर्भातील व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला ट्रेनिंग मिळणं अनिवार्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -