महायुतीच्या मेळाव्यावर शिवसैनिकांचा बहिष्कार

भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील आयोजित केलेल्या भाजप, शिवसेना महायुतीच्या मेळाव्यात पुन्हा शिवसैनिकांनी नारजी व्यक्त करत मेळाव्यावर बहिष्कार घातला.

Mumbai
Bhiwandi MP Kapil Patil
भिवंडी खासदार कपिल पाटील

भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील आयोजित केलेल्या भाजप, शिवसेना महायुतीच्या मेळाव्यात पुन्हा शिवसैनिकांनी नारजी व्यक्त करत मेळाव्यावर बहिष्कार घातला. त्यामुळे हा युतीचा मेळावा रद्द केल्याची घटना समोर आली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसतशी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसैनिकांची नारजी अधिक वाढू लागली आहे. नाराज शिवसैनिकांनी संख्येत वाढ होत असल्याने भाजपचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पाच मिनिटातच मैदान रिकामं

भिवंडी ग्रामिण विधानसभा मतदारसंघात काल, रविवारी सायंकाळी अंबाडी येथे जिल्हा परिषदेच्या अंबाडी, दाभाड, गणेशपुरी या गटांच्या युतीमधील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र मेळाव्याच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर ग्रामीणचे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, तालुका प्रमुख विश्वास थळे आणि शिवसेनेचे भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे, रूपेश म्हात्रे यापैकी कोणत्याही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मेळाव्यासाठी उपस्थित झालेल्या शिवसैनिकांनी ऐनवेळी या सभेवर बहिष्कार टाकत तिव्र निषेध व्यक्त करत सभेच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला तसेच भाजप नेत्यांच्या मनात अजूनही दुजाभाव आहे तर आम्ही कशासाठी थांबायचे, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिल्या. पाच मिनिटातच सपूंर्ण मैदान रिकामे झाले होते.

शिवसैनिकांनी घेराव घातला

दरम्यान, शिवसेना ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे हे मेळाव्यासाठी येत होते. मात्र त्यांना रस्त्यातच गाठून शिवसैनिकांनी घेराव घालून त्यांच्याकडे शिवसैनिकांनी संताप व्यक केला. मेळाव्यास जाण्यास मज्जाव केला. तर काहीनी जिल्हा प्रमुख आणि आमदार यांना देखील सभेसाठी न जाण्याची शिवसैनिकांनी केलेली विनंती स्वीकारताच सभेकडे जाणे स्थानिक सेना नेत्यांनी टाळले. यामुळे हा मेळावा भाजप कार्यकर्त्यानी अखेर रद्द केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here