घरमुंबईज्यांनी सेनेविरोधात दात उचकटले, त्यांचे दात घशात घालणार - संजय राऊत

ज्यांनी सेनेविरोधात दात उचकटले, त्यांचे दात घशात घालणार – संजय राऊत

Subscribe

ज्यांनी शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांवर आपले दात उचकटले होते, त्यांचे दात घशात घातले जातील अशा कडक शब्दात संजय राऊत यांनी आपली भूमिका आज प्रसारमाध्यमांसमोर मांडली. सेनेच्या केसालाही धक्का लागणार नाही अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आमच्या प्रमुख लोकांवर किती चिखल फेकणार असाही सवाल त्यांनी केला. आम्ही सीबीआयच्या अहवालाची वाट पाहत आहोत. जर कोणी राज्याची बदनामी करत असतील तर उसळून उठल पाहिजे. षंडासारख बसून चालणार नाही ही भूमिका खुद्द शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही आहे.

विरोधकांशी सर्वात जास्त संवाद हवा

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील मुख्य नेते आहेत. महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक पाहत आहेत. त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी आहे. राज्यातील एका तरूण अशा चांगल्या नेत्याची मुलाखत घेण्यासाठी मी भेटलो होतो. येणाऱ्या दिवसातही पुन्हा भेटणार आहे. पुढच्या भेटीत निवडणुकीची तारखी ठरेल. पण ही मुलाखत बिहार निवडणूकीआधी असेल की नंतर असेल ही बाब मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवली. यापुढच्या काळातही फडणवीस यांना भेटणार याचे संकेत त्यांनी दिले. राजकारणी भेटतात त्यावेळी राजकारणवर चर्चा तर होतेच असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. राज्यातल्या विरोधकांसोबत सर्वात जास्त संवाद असायला हवा असे मी मानतो. टीकाकार असतातच, त्यांच्याशी सर्वात जास्त संवाद व्हायला हवा.

- Advertisement -

भाजपकडे पाच वर्षे काम नाही

राजकीय भूकंप वगैरे होणार नाही यावरही त्यांनी स्पष्टोक्ती दिली. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी पहाटे गजर लावून ठेवला का ? असाही सवाल त्यांनी केला. मध्यवर्ती निवडणूकांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य सकारात्मक पद्धतीने घेतो. निवडणूक नको ही आमचीही इच्छा आहे. येत्या पाच वर्षात निवडणूका होणार नाहीत असाही टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर लगावला. येत्या पाच वर्षात भाजपकडे काही काम नाही, म्हणूनच त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत असेही त्यांनी सांगितले. पण आमचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बिहारमध्ये २०-२५ जागा लढवणार

 

आम्ही बिहारची निवडणुक ही सातत्याने लढतो आहे. त्याठिकाणी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे २०-२५ जागा सातत्याने लढतो आहोत. आम्हाला यंदाही लढण्याची इच्छा आहे, त्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. गुप्तेश्वर पांडे यांनी राजीनामा देऊन निवडणूकीत जाण्याचा निर्णय घेणे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. पण त्यामध्ये एक गोष्ट वाईट आहे ते म्हणजे सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. गुप्तेश्वर पांडे यांनी यांनी राजकीय पक्षात जाव, निवडणूक लढावी हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. पण त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करून महाराष्ट्र पोलिस विरूद्ध बिहार पोलिस राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

कृषी विधेयकावर सरकार भूमिका मांडणार

 

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंगेस पक्षाने कृषी विधेयकावर आपली भूमिका मांडली आहे. पण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष यांच्यात बैठका सुरू आहेत. त्याबाबतची सरकारची भूमिका लवकरच जाहीर करण्यात येईल असेही राऊत यांनी सांगितले.

कंगना रनौत तरूण

मी मांडलेली भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे, महाराष्ट्राची भूमिका आहे. कंगना रनौत तरूण आहे. तरूणांनी राग व्यक्त करायला हवा, नाहीतर त्या रागाचा विस्फोट होतो. पण रागात विकृती नसायला हवी असाही सल्ला त्यांनी कंगनाला दिला आहे.


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -