शुभमला मिळाली युएसची फेलोशिप

shubham gawde
शुभम बिस्वाल

पर्यावरण समस्यांवर करणार अभ्यास

पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास करण्यासाठी मुंबईच्या विद्यार्थ्याला युएसची फेलोशिप मिळाली आहे. शुभम बिस्वाल असे या विद्यार्थ्याचे नाव असून युएसमधल्या मोन्टाना विद्यापीठात तो पर्यावरण समस्यांवर अभ्यास करणार आहे.

देशांतील २० शैक्षणिक संस्था

युएसमधील मोन्टाना विद्यापीठाकडून पहिल्यांदाच पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी फेलोशिप देण्यात आली आहे. ब्राझील, चीन, भारत, जपान आणि रशिया या पाच देशांतील २० शैक्षणिक संस्थाची या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. देशातून ४ विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यात मुंबईच्या शुभम बिस्वासचा समावेश आहे. या फेलोशिपमध्ये लेक्चर्स, कार्यशाळा, फील्ड ट्रीप्स आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असणार आहे. शुभम के.जे. सोमय्या महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयात तिसèया वर्षाला शिकत आहे. त्याच्या पर्यावरणीय अभ्यासाची रुची लक्षात घेत त्याला या फेलोशिपसाठी निवडण्यात आले आहे.

या फेलोशिपअंतर्गत हवामानातील बदल, वने, जल व्यवस्थापन, जलविद्युत क्षेत्र, पर्यावरणातील मूल्यांकन, अन्नसुरक्षा आणि सीमांतर्गत सुरक्षा याविषयावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. शुभमने या आधी पर्यावरणपूरक कामे केली आहेत. गणेशोत्सवाचे सर्वेक्षण, आदिवासी भागात कचऱ्याचे व्यवस्थापन, घरगुती कचरा व्यवस्थापन, अन्नदान मोहिम यात संशोधन करून त्याने अनेक ठिकाणी प्रकल्प राबविले आहेत.
शिवाय जागतिक स्तरावरील पर्यावरणीय विषयाचा सखोल अभ्यास शुभमने केला असून या सगळ्याचा फायदा त्याला ही फेलोशिप मिळण्यासाठी झाला आहे, असे के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्सच्या डीन डॉ. सुगंधा शेट्टे यांनी सांगितले.

जागरुकता मोहिमेचे आयोजन करणार

फेलोशिपनंतर देशात पर्यावरण मोहिमांचे आयोजन करण्याचा मानस आहे. जागरुकता मोहिमेसोबतच पुन्हा एकदा वेगवेगळया पर्यावरणीय संकल्पना राबविणार आहे.
शुभम बिस्वाल, विद्यार्थी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here