घरमुंबईडोंबिवलीत सर्पदंशाने सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

डोंबिवलीत सर्पदंशाने सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

Subscribe

डोंबिवली येथे विषारी सापाने चावा घेतल्याने एका लहानग्या मुलीचा मृत्यू झाला आहे. स्वरा वाघमारे असे या सहा वर्षीय बालिकेचे नाव आहे. पालिकेच्या रूग्णालयात वेळेवर उपचार झाले नाहीत त्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाल्याची घडना समोर येत आहे.

विषारी सापाने दंश केल्याने एका लहानग्या मुलीचा मृत्यू झाला आहे. स्वरा वाघमारे असे या सहा वर्षीय बालिकेचे नाव आहे. ही दुर्देवी घटना डोंबिवली येथे घडली आहे. स्वराला पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात नेले असता. तिथे अतिदक्षता विभागात डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याने तिला वेळेवर उपचार मिळू शकले नसल्याने. तिला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शास्त्रीनगर रूग्णालयात ठिय्या आंदोलन करीत पालिकेच्या कारभाराचा निषेध केला आहे. डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आरोग्य मंत्रयाची जबाबदारी आहे. स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण हे सरकारमधील राज्यमंत्री आहेत आणि महापालिकेत २५ वर्षे शिवसेना भाजपची सत्ता आहे. सगळी सत्ता हातात असतानाही, डोंबिवलीत पालिकेचे सुसज्ज आणि अत्याधुनिक रूग्णालय उभारता आलेले नाही. त्यामुळे पालिकेचे रूग्णालय केवळ शोभेपुरतेच उभारले असून, डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे पून्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

प्रातिनिधीक फोटो
रूग्णालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन

नेमक झाले काय?

डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव ठाकुर्ली या परिसरातील वाघमारे कुटूंब राहवासी आहेत. काही दिवसांपूर्वी ते याठिकाणी राहण्यास आले आहेत. शुक्रवारी दि. १२ रोजी सकाळी अकरा वाजता स्वरा ही घराच्या अंगणात खेळत होती. याचवेळी तिला विषारी सापाने पायाला दोन ठिकाणी दंश केला. आजूबाजूच्या रहिवाशांनी हे पाहताच तिला ताततडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी इंजेक्शन आणि ओषधोपचार केल्यानंतर पालिकेतील अतिदक्षता विभाग कार्यरत नसल्याने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात हलिवण्यास सांगितले. मात्र, नातेवाईकांनी तिला खासगी रूग्णालयात दाखल केले. रात्री आठच्या सुमारास स्वराचा मृत्यू झाला. मात्र, पालिकेच्या रूग्णालयात स्वरावर तातडीने उपचार मिळाले असते तर स्वराचा जीव वाचला असता. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी शनिवारी दि. १३ रोजी रूग्णालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करीत पालिकेच्या यंत्रणे विरोधात निषेध केला आहे. पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी करीत विष्णुनगर पेालीस ठाण्यात धाव घेतली आहे.

स्वरा वाघमारे या बालिकेला पायावर दोन ठिकाणी सापाने दंश केला होता. पेशंट सिरीअस होता त्यामुळे रूग्णालयात आल्यानंतर तिला सर्पदंशावरील इंजेक्शन आणि औषधे देऊन तातडीने उपचार करण्यात आले. सर्व उपचार केल्यानंतर पेशंटला आयसीयुची गरज हेाती. मात्र, डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग नसल्याने पालिकेतील आयसीयू विभाग बंद आहे त्यामुळे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कळवा येथील रूग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. १०८ रूग्णवाहिका अनेक महिन्यांपासून कार्यरत होती. मात्र, एक आठवडापासून ही सेवा काढण्यात आली आहे. तसेच मुंबईतील आरोग्य विभागाकडूनच ही काढण्यात आल्याचे समजले. त्यासंदर्भात वरिष्ठांना सुचना देण्यात आली आहे. पेशंटवर उपचार करण्यात पालिका रूग्णालयातील डॉक्टरांकडून कोणतीच हयगय केलेली नाही.

— डॉ चंद्रशेखर सावकारे, मुख्य वैद्यकिय अधिकार शास्त्रीनगर रूग्णालय

- Advertisement -

या गोष्टी रुग्णालयात नाहीत

पालिकेच्या रूग्णालयात डॉक्टर नाहीत. त्यामुळे कोणत्याच रूग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत. स्वरा वाघमारे या बालिकेला वेळेवर उपचार मिळाले नाही त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. तिला दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यासाठी पालिकेची रूग्णवाहिका नव्हती. १०८ ही रूग्णवाहिका ही नव्हती. पालिकेच्या रूग्णालयात केवळ नाक, कान आणि घसा यावरच उपचार केले जातात. रुग्णाला कळवा किंवा मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णालयात आयसीयू विभाग नाही, सोनग्राफी मशिन धुळखांत पडली आहे, बालरोगतज्ञ नाहीत, सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे स्वराच्या मृत्यूला पालिकाच जबाबदार असून पालिका आयुक्तावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आनंद नवसागरे यांनी केली आहे.

रूग्णायातील डाक्टरांची संख्या

  • स्त्रीरोगतज्ञ – ४
  • बालरोगतज्ञ – ६
  • फिजीशियन – २
  • सर्जन – २
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -