घरताज्या घडामोडीकोस्टल रोडसाठी ६०० झाडांची कत्तल होणार

कोस्टल रोडसाठी ६०० झाडांची कत्तल होणार

Subscribe

दक्षिण मुंबईतील रहिवाशांचा विरोध

मुंबई महापालिकेने कोस्टल रोडच्या कामासाठी वृक्ष छटाईसाठीची नोटीस नुकतीच भुलाभाई देसाई रोड येथे लावली आहे. त्याठिकाणचे एकुण १४० वृक्ष कापण्यात येणार आहेत. तर आणखी ५०० वृक्ष हे वरळी ते मरीन ड्राईव्ह या परिसरातील कापण्यात येणार आहेत. पण महापालिकेने लावलेल्या या वृक्ष छटाईच्या नोटीशीला दक्षिण मुंबईतील रहिवाशांनी मात्र विरोध केला आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी ६०० झाडांपैकी एकही झाड कापू देणार नाही अशी स्थानिक रहिवाशांनी भूमिका मांडली आहे.

जनसुनावणी होणार ?

- Advertisement -

महापालिकेने लावलेल्या नोटीशीनुसार १४० झाडांपैकी ६१ झाडे कापण्यात येतील. तर उर्वरीत ७९ झाडांचे पुर्नरोपण करण्यात येणार आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पाअंतर्गत रस्ता विस्तारीकरण आणि पार्किंगसाठी ही झाडे कापावी लागणार आहे. त्यामुळेच महापालिकेने ही नोटीस जारी केली आहे. झाडे कापण्याच्या संपुर्ण प्रक्रियेत रहिवाशांकडून कोणत्याही हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या नाहीत म्हणून स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. कोणत्याही प्रकल्पात वृक्ष छटाई करताना स्थानिकांच्या सूचना आणि हरकती घेणे आवश्यक असते. पण या नोटीशीमध्ये कोणताही तसा उल्लेख नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. सूचना आणि हरकती दाखल करण्यासाठीची अंतिम मुदतही या नोटीशीत देण्यात आलेली नाही. तर कोणतीही जनसुनावणी होणार की नाही याचाही उल्लेख नसल्याची टीका स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

महापालिकेने येत्या काळात अशी नोटीस पाठवण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. सविस्तर नोटीस लावण्यात येईल तसेच सात दिवसांचा कालावधीही सूचना आणि हरकतींसाठी देण्यात येईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पासाठी महापालिकेने गेल्या वर्षी अशा प्रकारची १४० वृक्ष कापण्यासाठीची नोटीस दिली होती. प्रिन्सेस स्ट्रिट ते वरळी सी फेस असा कोस्टल रोडचा टप्पा हा सी लिंकच्या प्रकल्पाशी जोडला जाणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – तारापूरमध्ये कांदळवनाच्या जमिनीवर बेकायदा इमारत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -