घरCORONA UPDATEएसटीचे चालक-वाहक झाले ‘किचन किंग’! दररोज २५० कर्मचाऱ्यांचं बनवतात जेवण

एसटीचे चालक-वाहक झाले ‘किचन किंग’! दररोज २५० कर्मचाऱ्यांचं बनवतात जेवण

Subscribe

लॉकडाऊन’मुळे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स आणि कँटिन गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीची सेवा देणाऱ्या चालक-वाहकांना उपाशी रहाण्याची पाळी आली होती. मात्र एसटी महामंडळांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे हाल होऊन नयेत, याकरता पनवेल डेपोला शिधा देऊन, त्यांच्या स्वयंपाकाची सुविधा डेपोतच उपलब्ध करून दिली आहे. हा स्वयंपाक दुसरे तिसरे कोणी नाही तर ज्याला उत्तम जेवण बनवता येते, अशा एसटी कर्मचाऱ्यालाच ही जबाबदारी दिली गेली आहे. स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्याला एसटीचे सर्व कर्मचारी मदत करतात, त्यामुळे एसटीचे चालक-वाहकच आता किचन किंग झाले आहेत!

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने मुंबई, पालघर, ठाणे या विभागातून बस चालवण्यात येत आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता एसटीचे चालक-वाहक अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा देत आहेत. एसटीच्या या तिन्ही विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे एसटी महामंडळाने राज्यभरातून एसटीचे चालक वाहक मुंबई विभागात बोलावले. सुमारे ९७५ एसटी बसेस आणि १ हजार २५० चालक मुंबई, पालघर, ठाणे येथे दाखल झाले आहेत. या तिन्ही विभागांच्या एसटी डेपोतच एसटी कर्मचारी राहतात. कोरोनामुळे एसटीच्या अनेक डेपोतील कँटिन बंद आहे. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊन नये, याकरता एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे. त्यापैकी पनवेल डेपोमध्ये कँटिन आणि हॉटेलची सुविधा नसल्याने, एसटी महामंडळाकडून स्वयंपाकासाठी पनवेल आगाराला शिधा तसेच स्वयंपाकाला लागणारे भाजीपाला आदी वस्तू पुरवण्यात येत आहेत.

- Advertisement -

दररोज २५० कर्मचाऱ्यांचा होतो स्वयंपाक

पनवेल डेपोत लॉकडाऊन काळात कमीत कमी पन्नास कर्मचाऱ्यांचं जेवण तयार करण्यात येत होतं. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी इतर जिल्ह्यातून एसटीच्या कर्मचाऱ्यांना कार्तव्यावर बोलावण्यात आल्यामुळे त्यांना आता तब्बल २५० कर्मचाऱ्यांचं जेवण तयार करावं लागत आहे. हे जेवण तयार करत असताना इतर कर्मचारी पुढाकार घेऊन एकामेकांच्या मदतीने हा स्वयंपाक करतात. सर्व मिळून एकत्र जेवण करतात.

पनवेल आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची जेवणाची सोयही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. याकरता एसटीकडून शिधा आणि दररोज भाजीपाला सारख्या आवश्यक सर्व वस्तू उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ज्यांना जेवण करता येतं, त्यांना जेवण बनवण्याचे काम देण्यात आलं आहे. इथे स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे.

व्ही. डी. गावंडे, आगर कनिष्ठ व्यस्थापक, पनवेल

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -