घरताज्या घडामोडीCorona: लॉकडाऊनमध्येही सरकारी वसूली, आंतरराष्ट्रीय शाळांच्या फीच्या मागणीने लोक त्रस्त

Corona: लॉकडाऊनमध्येही सरकारी वसूली, आंतरराष्ट्रीय शाळांच्या फीच्या मागणीने लोक त्रस्त

Subscribe
कोरोना संकटात लॉकडाऊन सुरू असतानाही आंतरराष्ट्रीय शाळांद्वारे मागण्यात येणारी फी आणि सरकारी‌ यंत्रणांच्याद्वारे सुरू असलेले विविध करांची वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एका पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये मुंबई भाजप अध्यक्ष लोढा यांनी सरकारला म्हंटले आहे की, मुंबईमध्ये काही आंतरराष्ट्रीय शाळा आपल्या विद्यार्थ्यांची फी भरण्यासंदर्भात पालकांना सांगत आहे. लोक सध्या तरी घरी बसून आहेत आणि बाहेर सर्व काही बंद आहे. तरीही शाळा ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे पालक अतिशय तणावात आहेत.
तसेच महानगरपालिका आणि काही अन्य सरकारी विभाग लॉक डाऊनच्या स्थितीतही लोकांकडून वेगवेगळे कर इ. वसुलीची सक्ती करत आहेत. त्यांना नोटीसही पाठवत आहेत. लोढा यांनी सरकारला लिहिले आहे की, आंतरराष्ट्रीय संकटाच्या या काळात भारतीय रिझर्व्ह बँक आणि अन्य बँका तसेच आर्थिक संस्थांच्या वसुलीला तीन महिने पुढे ढकलण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याच धर्तीवर सार्वजनिक हिताशी संबंधित ह्या दोन महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भात राज्य सरकारने नोंद घ्यावी. फी वसूली तसेच सरकारी कराच्या मागणीला थांबवण्याचा आदेश जारी करावा. त्यांनी म्हटले की, जनता कोरोनासारख्या महामारीच्या संकटाला सामोरे जाताना आधीच अडचणीत आहे आणि त्यात सरकारी यंत्रणा आणि शाळा नोटीस पाठवून जनतेला त्रस्त करत आहेत.
कोरोना संकटात अडकलेल्या लोकांना मदत करण्याच्या या मागणीबरोबरच भाजपा मुंबई शहर अध्यक्ष लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सुद्धा दिले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, कोरोना व्हायरसच्या विरोधात मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात ते आणि राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत जागरूकता ठेवून महत्त्वाचे, प्रभावी असे काम करत आहेत. अशा भीषण आपत्तीच्या काळात आंतरराष्ट्रीय शाळांच्या फीस वसुलीला अटकाव करावा व सरकारी विभागांची वसुली थांबवण्यासंदर्भात जनतेच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा व जनतेला दिलासा द्यावा, अशी आग्रहाची विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -