घरमुंबईइंजिनियरींगच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

इंजिनियरींगच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

Subscribe

दोन दिवसांत 85 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

तांत्रिक अडचणीमुळे रद्द केलेली इंजिनियरींगची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून नव्याने सुरू केली. नव्याने सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेला दोन दिवसांत विद्यार्थ्यांना उर्त्स्फूत प्रतिसाद दिला आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल 85 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील 25 हजार विद्यार्थ्यांनी आपले अर्ज निश्चित केले आहेत. त्यामुळे आठवडाभरात इंजिनियरींगची प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्याची शक्यता सीईटी सेलमधील अधिकार्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

इंजिनियरींगची प्रवेश प्रक्रियेच्या सीईटीचा निकाल लागल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने राज्यातील तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्याने प्रवेशासाठीचे संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन झाले. सलग चार दिवस विद्यार्थ्यांना समस्या येत असल्याने अखेर सीईटी सेलकडून संकेतस्थळ बंद करत प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यानंतर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

त्यानुसार सोमवारपासून इंजिनियरींगची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तब्बल 85 हजार 310 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यातील 45 हजार 771 विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरला आहे. परंतु एफसी केंद्रावर जाऊन आपला अर्ज निश्चित केलेला नाहीत. तर 24 हजार 769 विद्यार्थ्यांनी एफसी केंद्रावर जाऊन आपले अर्ज निश्चित केले आहेत. अर्ज नोंदणी केलेल्यापैकी 48 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शुल्क भरले आहे. दोन दिवसांत विद्यार्थ्यांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत सीईटी सेल व डीटीईच्या अधिकार्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडेल असा विश्वासही सीईटी सेलचे आयुक्त डॉ. माणिक गुरसाळ यांनी व्यक्त केला.

पुणे व मुंबई सर्वाधिक विद्यार्थी इंजिनियरींगला
इंजिनियरींग प्रवेश प्रक्रियेसाठी एफसी केंद्रावरून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, यामध्ये पुणे व मुंबई विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थ्यांनी इंजिनियरींगला सर्वाधिक पसंती दिली आहे. पुणे विद्यापीठांतर्गत विद्यार्थी सर्वाधिक 6896 अर्ज तर मुंबईतील 5198 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल शिवाजी विद्यापीठ 2549, नागपूर विद्यापीठ 2530, जळगावमधील कवियत्री बहिणाबई चौधरी विद्यापीठांतील 1777, अमरावती विद्यापीठ 1728 मराठवाडा विद्यापीठांतील 1432 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

- Advertisement -

इंजिनियरींगकडे मुलींचा ओढा कमी
इंजिनियरींगच्या प्रवेश अर्ज नोंदणीदरम्यान अर्ज निश्चित केलेल्या 24 हजार 679 अर्जांमध्ये 16 हजार 894 अर्ज मुलांचे असून, 7874 अर्ज मुलींचे आहेत. तर एक अर्ज तृतीयपंथीय विद्यार्थ्याचा आहे.

विद्यापीठ -विद्यार्थी
पुणे -6896
मुंबई -5198
शिवाजी विद्यापीठ -2549
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ -2530
कवियत्री बहिणाबई चौधरी विद्यापीठ, जळगाव -1777
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ -1728
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ -1432
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ -983
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड -732
गोंडवाना विद्यापीठ -319

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -