दहावीच्या परीक्षेसाठी 10 दिवस 12 तासाचे ‘अभ्यास शिबिर’

डी.एस. हायस्कूलच्या ’अभ्यास शिबिरा’चे 61वे वर्ष

Mumbai
School

सायन, धारावी, प्रतिक्षानगर परिसरातील दहावीमधील विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेत अधिकाधिक गुण मिळावेत, यासाठी सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलतर्फे घेतलेले 61वे अभ्यास शिबिर नुकतेच पार पडले. 2 ते 13 जानेवारीदरम्यान झालेल्या शिबिरात शाळेतील दहावीचे 300 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.

कष्टकरी वर्गातील पालकांची मुले दहावीच्या परीक्षेत मागे राहू नयेत, तसेच चांगले गुण मिळवून त्यांनाही करीअरच्या विविध वाटा चोखाळण्याची संधी मिळावी, या हेतूने शाळेच्या संस्थापक-शिक्षकांनी तब्बल सहा दशकांपूर्वी दहावीच्या अभ्यास शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात आणली. 61 वर्षं दरवर्षी न चुकता आम्ही हे 10 दिवसीय अभ्यास शिबिर आयोजित करत आहोत. या शिबिरामुळे जे विद्यार्थी अभ्यासात मागे असतात, ते उजळणी तसंच स्वयंअध्ययनामुळे चांगले गुण मिळवतात, असा अनुभव आहे, अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.

दररोजच्या 12 तासांच्या अभ्यास शिबिरात सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या उपस्थितीत चार टप्प्यांत तीन तास स्वयंअध्ययन करतात, तर सात तासांत चार प्रश्नपत्रिका सोडवतात. सर्व विद्यार्थी दुपारचे भोजन तसेच चहापान शाळेतच करतात, अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक अंकुश महाडीक ह्यांनी दिली.

अभ्यास शिबिराची दैनंदिनी

n 7.00 – वर्गात उपस्थिती
n 7.05- 7.15 – प्रार्थना
n 7.15- 8.00 – स्वयंअध्ययन
n 8.00-9.45 – सराव परीक्षा 1
n 9.45- 10.10 – मधली सुट्टी
n 10.10- 10.55 – स्वयंअध्ययन
n 10.55- 12.40 – सराव परीक्षा 2
n 12.40- 1.15 – भोजन
n 1.15- 2.00 – स्वयंअध्ययन
n 2.00- 3.45 – सराव परीक्षा 3
n 3.45- 4.15 – चहापान
n 4.15- 5.00 – स्वयंअध्ययन
n 5.00- 6.45 – सराव परीक्षा 4
n 6.45- 7 – सूचना, पसायदान, घरी जाणे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here