घरमनोरंजनSushant Sucide Case : रियाची मागणी ED ने फेटाळणी; चौकशी आजच होणार

Sushant Sucide Case : रियाची मागणी ED ने फेटाळणी; चौकशी आजच होणार

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणी रिया चक्रवर्ती हिची आज (ED) ईडीकडून चौकशी होणार आहे. मात्र रियाने तिच्या वकिलांमार्फत ही चौकशी पुढे ढकलण्याची मागणी ईडी केली आहे. सुप्रिम कोर्टातील सुनावणीचा निर्णय येईपर्यंत ही चौकशी पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती तिने केली. परंतू ईडीने तिची ही मागणी फेटाळली आहे.

सीबीआयने गुरूवारी या प्रकरणी एफआयआर दाखल केली होती. ज्यामध्ये रियासह ६ लोकांना आरोपी ठरवण्यात आले आहे. चौकशीसाठी सीबीआयने (SIT) एसआयटीची नेमणूक केली आहे. ही टीम गुजरातचे केडर आयपीएस मनोज शशिधर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. सुशांतच्या केसमध्ये रियाला ७ ऑगस्ट, शुक्रवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. रियाशी तिच्या मालमत्तेसंबंधी तसेच सुशांतसोबत झालेल्या व्यवहारासंबंधी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांची काल ईडीकडून जवळपास ९ तास कसून चौकशी करण्यात आली आहे. ईडी आफिसमधून चौकशीनंतर बाहेर पडलेला सॅम्युअल मीडियाशी काहीही न बोलता निघून गेले. मिरांडा काल दुपारी दीड वाजता ईडी कार्यालयात हजर झाले होते.. मिरांडा रियाचे आर्थिक व्यवहार पाहायचे. बँक खाती, पैसे काढणे, पैसे भरणे, आर्थिक व्यवहार अशी कामे ते करत होते.

- Advertisement -

हेही वाचा –

Coronavirus: देशात बाधितांचा आकडा २० लाखांपार! २४ तासात ६२,५३८ नवे रूग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -