घरदेश-विदेशSushant Case Live : हे तर गलिच्छ राजकारण - आदित्य ठाकरे

Sushant Case Live : हे तर गलिच्छ राजकारण – आदित्य ठाकरे

Subscribe

सुशांत सिंग ज्या डान्सक्लासमध्ये जात असे त्याच्या मालकाने एक नवीन गोष्ट उघड केली आहे. गणेश हिवरकर यांनी सांगितले की सुशांतसिंगने त्याला नैराश्यातून मुक्त होण्यासाठी कशी मदत केली आणि रिया चक्रवर्ती आल्यानंतर या दोघांमधील अंतर कसे वाढले.


- Advertisement -

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या प्रकरणावरून सध्या विरोधी पक्ष ठाकरे सरकार आणि पोलिसांवर आरोप करत आहेत. तसेच या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचे देखील बोलले जात आहे. पण अखेर या प्रकरणाबाबत आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले आहे. ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करू नका. या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही’, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.


बिहारमधून मुंबईला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंबंधी तपास करण्याकरता आलेल्या पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांनी कोणच्याही पोलीस केससंबंधी चर्चा न करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. सोबतच त्यांनी स्वतः लिहिलेली एक कविताही व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली आहे.

- Advertisement -


सुशांतच्या बँकेतून ५० कोटी काढले; मुंबई पोलीस गप्प का?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत असतानाच आता, या प्रकरणाच्या तपासावरून राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान, ‘बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस आर्थिक दृष्टीकोनातून तपास करीत नसल्याचा’, आरोप बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे. गेल्या वर्षांत सुशांतच्या बँक खात्यातून तब्ब्ल ५० कोटी रुपये काढले गेले. मात्र, गेल्या वर्षात केवळ १५ कोटी रुपये काढल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे. सविस्तर वृत्त


Sushant Sucide Case : बिहार सरकारची सीबीआय चौकशीची शिफारस

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस बिहार सरकारने केली आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली. या नंतर राज्याचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. सविस्तर वृत्त 


जर महाराष्ट्र शासनाचा पोलिसांवर अभिमान असेल तर सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर त्यांनी ५० दिवसांत काय केले ते सांगावे. मुंबईने आमच्याशी असलेल्या सर्व संपर्क वाहिन्या बंद केल्या आहेत. यातून काहीतरी चुकीचे असल्याचे सूचित होते, बिहारचे डीजीपी जी. पांडे यांनी म्हटले आहे.


बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबईत आलेले बिहार राज्यातील पाटणाचे पोलीस अधीक्षक बिनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेकडून क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारून त्यांना गोरेगाव येथील राज्य राखीव दलाच्या अधीकारी कक्ष येथे क्वॉरंटाईन केले आहे. यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने या घटनेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांनी फक्त केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन केले आहे. तर आता पटनातील आयजीपी संजय सिंग यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून आमच्या पोलीस अधीक्षकाला क्वॉरंटाईनमधून मुक्त करा, अशी विनंती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -