घरदेश-विदेशAyodhya: राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त सांगणाऱ्या पुजाऱ्याला मिळाली धमकी!

Ayodhya: राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त सांगणाऱ्या पुजाऱ्याला मिळाली धमकी!

Subscribe

धमकीप्रकरणी बेलगावी येथील टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अयोध्येत भव्य राम मंदिराचे भूमीपूजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी ४० किलो चांदीच्या विटांनी राम मंदिराची पायाभरणी करतील. अशी माहिती मिळाली आहे की, राम मंदिराच्या पायाभरणीच्या आधी कर्नाटकच्या बेलगावी येथे राम मंदिर भूमीच्या पूजेची वेळ अर्थात मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. या रामजन्मभूमी पूजनाचा मुहूर्त सांगणाऱ्या कर्नाटकातील बेलगावच्या पुजाऱ्याला धमकावले असल्याचे वृत्त समोर येत आहे. या संदर्भात बेलगावी येथील टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राम मंदिराच्या भूमीपूजनाचा मुहूर्त सांगणाऱ्या ७५ वर्षीय पुजारी विजयेंद्र यांना फोनवरून धमकी देण्यात आली. या धमकीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे बेलगावी पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

पुजारी विजयेंद्र म्हणाले, ‘धमकी देणारा व्यक्ती फोनवर म्हणाला की तू मुहूर्ताची तारीख का सांगितली? आपण त्यामध्ये सहभागी का आहात? यावर पुजाऱ्यांनी सांगितले की, आयोजकांनी मला भूमिपूजनाची तारीख, मुहूर्त देण्याची विनंती केली होती आणि मी सांगितले. धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव उघड केले नाही. यापूर्वी, बर्‍याचदा फोन येत होते. पण, मी आजपर्यंत त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही.

पुजारी विजयेंद्र यांना धमकी मिळाल्यानंतर बेलगावी येथील शास्त्री नगर येथील पुजारी निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, फोन करून धमकावणाऱ्याने या पुजाऱ्याला मुहूर्त मागे घेण्यास सांगितले होते. दरम्यान, विजयेंद्र मागील अनेक वर्षांपासून राम मंदिर आंदोलनाशी संबंधित आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोजकांनी मुहूर्त काढण्यासाठी त्याच्यांशी संपर्क साधला असल्याचे सांगण्यात येत आहे.


अयोध्येत गणेश पूजनाने श्री राम मंदिर भूमीपूजनाचा ‘श्री गणेशा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -