घरमनोरंजन'सुशांतची आत्महत्या नव्हे, तर उशीने तोंड दाबून हत्या'

‘सुशांतची आत्महत्या नव्हे, तर उशीने तोंड दाबून हत्या’

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपासाला सुरूवात केली आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पासून त्याच्या जवळचे मित्र, कुटुंबिय या सर्वांची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, त्याच्या मृत्यूवर अनेक तर्क वितर्क लावले जात असताना सुशांतची आत्महत्या नव्हे तर त्याची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली असल्याचा दावा अॅड. आयुषी यांनी केला आहे. या संबंधीचे ट्विट त्यांनी केले असून यामध्ये दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

- Advertisement -

अॅड. आयुषी यांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे 

आपल्या ट्विटमध्ये आयुषी यांनी म्हटले आहे की, या सर्व घटनांच्या मागे महेश भट्ट यांचा हात आहे. सुशांतवर नैराश्य, ड्रग अॅडिक्शन आणि बॉलीवूडमधील करिअरच्या चढ-उतारामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे महेश भट्ट यांच्याकडून पसरवले जात आहे. असेच त्यांनी या पूर्वीही अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबतही केले आहे. अॅड. आयुषी यांनी काही मुद्दे मांडून सुशांतची आत्महत्या की हत्या यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • जेव्हा कोणीही गळफास घेऊन आत्महत्या करतो तेव्हा त्याची मान मोडते, पण सुशांतच्या बाबतीत शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण एक्सफोलिएशन असल्याचे सांगितले गेले आहे. याचा अर्थ उशीने कुणाला ठार मारल्याचेही म्हटले जाते.
  • जर कुणी सुशांतचा मृतदेह पाहिला असेल तर सुशांतचे पाय एकमेकांवर बसले असल्याचे लक्षात येते, की कोणीतरी त्याचे दोन्ही पाय जोरात दाबले आहेत जेणेकरून मारेकरी सहजपणे त्याचे काम करू शकेल.
  • सुशांतच्या हाताचेही हेच आहे, सुशांतचे दोन हात पूर्णपणे ताणलेले आहेत. आपला हात पूर्णपणे पसरवून आत्महत्या कोणी करतो?
  • शिवाय सुशांतच्या उजव्या हाताला खोल लाल खुणा आहेत, ज्याच्याकडे फार कोणाचे लक्ष गेले नसावे. सर्व लोक लक्षात घेत नाहीत. त्या खुणा सुचित करतात की एखाद्याने आपला हात जोरदारपणे धरला आहे. जेणेकरून त्यांची हालचाल होऊ शकणार नाहीत.
  • सुसाइड नोटशिवाय पोलीस पूर्ण आत्महत्या असल्याचे कसे म्हणू शकतात? आणि पोलिसांना घटनास्थळावर सापडलेल्या ५ डायर्‍या त्यांनी का जाहीर केल्या नाही.
  • सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस आधी, त्याच्या घरावरील सीसीटीव्ही कॅमेरे खराब झाले असले तरीही पोलीस इतक्या सखोलपणे चौकशी का करत नाहीत.
  • सुशांतच्या खोलीच्या डुप्लिकेट चाव्या कुठे गेल्या? अखेर यामागे काय दडलंय.

हेही वाचा –

मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाईल टायपिंगचे धडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -