घरमुंबईसार्वजनिक बांधकाम विभागात डांबराचा भ्रष्टाचार?

सार्वजनिक बांधकाम विभागात डांबराचा भ्रष्टाचार?

Subscribe

महापालिका मुख्यालयासमोर 'डांबर खातयं कोण?' असा सवाल करत काँग्रेसने धरणे आंदोलन केले.

उल्हासनगर महापालिकेसमोर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे धरणा आंदोलन करण्यात आले. उल्हासनगर शहरातील रस्त्याची दुरवस्था नागरिकांचे होणारे अपघात, वाहन चालकाचे व रिक्षाचालकांचे होणारे आर्थिक नुकसान, ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणारे भ्रष्टाचार, झोपलेल्या सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा महासचिव रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली ‘डांबर खातयं कोण?’ हे धरणे आंदोलन करण्यात आले.

‘डांबर खाल्ले कुणी?’ काँग्रेसचा सवाल

उल्हासनगर शहरातील डांबरीकरणाची एकूण रस्त्याची लांबी ही ६१.९४ किलोमीटर आहे. या रस्त्याकरीता पाच वर्षात ३६ कोटी महापालिकेचे व शासनाचे २० कोटी असे एकूण ५६ कोटी रुपये खर्च करुन ही रस्त्याची चाळण झाली आहे. प्रत्येक डांबरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ५६ कोटी गेले कुठे याचा जाब विचारण्यासाठी ‘डांबर खाल्ले कुणी?’ हा प्रश्न काँग्रेस पक्षाकडून विचारला जात आहे. यामुळे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगर महापालिकेसमोर नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

७ वर्षात ५२५ रस्ते अपघात

या मंचावर भ्रष्टाचाराचा राक्षस उभा करून डांबराचे डब्बे ठेऊन महापालिकेचा निषेध करण्यात आला. उल्हासनगर शहरात गेल्या ७ वर्षात ५२५ रस्ते अपघात झाले असून त्यात १६३ लोकांचा बळी गेला असून या प्रशासनाला जाग येत नाही, असा सवाल महासचिव रोहित साळवे यांनी केला आहे.

शिष्टमंडळाने घेतली उपायुक्तांची भेट

पालिका आयुक्त सुधाकर देशमुख हे पालिका मुख्यालयात उपस्थित नसल्यामुळे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपायुक्त संतोष देहेरकर यांची भेट घेतली. यावेळी उपायुक्त संतोष देहेरकर यांनी भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. रस्त्यांना पडलेले खड्डे भरण्यासाठी निविदा काढण्यात आली असून लवकरात लवकर काम सुरू करणार असल्याचे आश्वासन संतोष देहेरकर यांनी दिले.

- Advertisement -

महापालिकेच्या अनास्थेविरोधात आंदोलन

या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिक्षा युनियन, दीपकभाऊ सामाजिक विकास संघटना व अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघ यांनी पाठींबा दर्शवला असून महापालिकेच्या अनास्थेविरोधात हे धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे रोहित साळवे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -