घरमहा @४८२५ - ठाणे लोकसभा मतदारसंघ

२५ – ठाणे लोकसभा मतदारसंघ

Subscribe

असा आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ...

मुंबईशी अत्यंत जवळ असल्यामुळे ठाणे शहर आणि आसपासचा भाग हा व्यावसाय-उद्योगधंद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच इथे मोठ्या प्रमाणावर लघु उद्योग पाहायला मिळतात. ज्यासाठी मुंबईत तयार घाऊक बाजारपेठ मिळते. शिवाय, मुंबईनंतर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सेवा क्षेत्र देखील केंद्रीत झालं आहे. त्यामुळे इथल्या राहणीमानाचा दर्जा हा पारंपरित कोळी किंवा स्थलांतरीत कोकणी न राहाता आता बिझनेस हब वृत्तीचा झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग ४वरचं महत्त्वाचं ठाणं म्हणून ठाण्याकडे पाहिलं जातं. सेवाक्षेत्राचा वरचष्मा असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा देखील चांगला आहे. इथे मराठी भाषिक बहुतांशी असले, तरी शहरी व्यक्तीमत्वाप्रमाणे इतर भाषिकदेखील दखलपात्र संख्येने आहेत. १९६२ सालापासून झालेल्या १४ लोकसभा निवडणुकांमध्ये प्रामुख्याने शिवसेनेचाच वरचष्मा या मतदारसंघावर राहिला आहे. विशेषत: १९९१ आणि नंतरच्या ७ निवडणुकांमध्ये ६ वेळा या मतदारसंघाने शिवसेनेचा खासदार दिला आहे. त्यातल्या ४ वेळा प्रकाश परांजपे लोकसभेवर गेले आहेत. दुसरे बाळासाहेब म्हणून ज्यांचा ठाण्यात दबदबा होता, अशा आनंद दिघेंचा हा मतदारसंघ असल्यामुळे शिवसेनेचं प्राबल्य ओघानं आलंच. या शिवसेनाशाहीला अपवाद होता तो २००९च्या निवडणुकांचा, राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांच्या रुपात!

 मतदारसंघाचा क्रमांक – २५

- Advertisement -

नाव – ठाणे

संबंधित जिल्हे – ठाणे

- Advertisement -

प्रमुख उद्योग-व्यवसाय – सेवाक्षेत्र कर्मचारी

प्रमुख शेतीपीक – NA

शिक्षणाचा दर्जा – ९२%

पुरुष – ९४.०१%

महिला – ८८.१४%


मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार(२०१४) – १० लाख ५३ हजार ६५८

महिला मतदार – ४ लाख ६२ हजार ६८४

पुरुष मतदार – ५ लाख ९० हजार ९५६


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल 

राजन बाबुराव विचारे – शिवसेना – ७ लाख ४० हजार ९६९

आनंद प्रकाश परांजपे – राष्ट्रवादी काँग्रेस – ३ लाख २८ हजार ८२४

मल्लिकार्जुन पुजारी – वंचित बहुजन आघाडी – ४७ हजार ४३२

नोटा – २० हजार ४२६


विधानसभा मतदारसंघ – आमदार

१४५ – मीरा-भाइंदर – नरेंद्र मेहता – भाजप

१४८ – ठाणे – संजय केळकर – भाजप

१५१ – बेलापूर – मंदा म्हात्रे – भाजप

१४६ – ओवळा माजीवाडा – प्रताप सरनाईक – शिवसेना

१४७ – कोपरी-पाचपाखाडी – एकनाथ शिंदे – शिवसेना

१५० – ऐरोली – संदीप नाईक – राष्ट्रवादी काँग्रेस

 

Shivsena MP Rajan Vichare
शिवसेना खासदार राजन विचारे

विद्यमान खासदार – राजन विचारे, शिवसेना

सर्वकाही शिवसेना अशाच स्वरूपाचा प्रवास राजन विचारेंचा राहिला आहे. लहानपणापासूनच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासोबत काम केल्यानंतर त्याच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून झाली. पुढे २००६मध्ये ते ठाणे महानगर पालिकेचे महापौर झाले. २००९मध्ये ठाण्यातूनच विधानसभेत आमदार म्हणून ते निवडून गेले. त्याच वर्षी ठाणे लोकसभेची जागा मात्र शिवसेनेच्या हातून गेली. ती पुन्हा मिळवण्यासाठी २०१४मध्ये आनंद परांजपेंऐवजी राजन विचारेंना संधी देण्यात आली. मोदी लाटेत पार उखडून पडलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव करणं राजन विचारेंना तेव्हा फार कठीण गेलं नाही. सुमारे अडीच लाख मतांनी राजन विचारे निवडून आले. यंदा मात्र मोदी लाटेच्या अभावी विचारेंना विजयासाठी कंबर कसून कामाला लागावं लागणार आहे. शिवाय, गेल्या निवडणुकीत तब्बल अर्धे मतदार घरात बसून राहिल्यामुळे यंदा त्या ५० टक्के मतदारांना घराबाहेर काढण्याचं देखील आव्हान इथल्या उमेदवारांसमोर असणार आहे.

२०१४मधील आकडेवारी

राजन विचारे – शिवसेना – ५ लाख ९५ हजार ३६४

संजीव नाईक – राष्ट्रवादी काँग्रेस – ३ लाख १४ हजार ०६५

अभिजित पानसे – मनसे – ४८ हजार ८६३

विद्याधर किर्तवडे – बसप – १० हजार ९८२

नोटा – १३ हजार १७४

मतदान टक्केवारी५०.८७%

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -