घरमुंबईरेल्वेने नाकारला ठाणे स्थानकाचा हेरीटेज वास्तूचा दर्जा

रेल्वेने नाकारला ठाणे स्थानकाचा हेरीटेज वास्तूचा दर्जा

Subscribe

बोरीबंदर ते ठाणे अशी आशिया खंडातील पहिली रेल्वे धावली होती. त्यामुळे ठाणे स्थानकाला इतिहास आहे. ठाणे स्थानकाला ऐतिहासिक दर्जा मिळावा म्हणून अनेक लोकप्रतिनिधीनी प्रयत्न केले. मात्र रेल्वेच्या ऐतिहासिक दर्जा देणार्‍या समितीने मात्र असमर्थता दर्शवली आहे.

बोरीबंदर ते ठाणे अशी आशिया खंडातील पहिली रेल्वे धावली होती. त्यामुळे ठाणे स्थानकाला इतिहास आहे. ठाणे स्थानकाला ऐतिहासिक दर्जा मिळावा म्हणून अनेक लोकप्रतिनिधीनी प्रयत्न केले. मात्र रेल्वेच्या ऐतिहासिक दर्जा देणार्‍या समितीने मात्र असमर्थता दर्शवली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या हेरिटेज दर्जाविषयी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वेकडे चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मध्य रेल्वेने केलेल्या तपासणीनुसार या भागात कोणत्याही प्रकारची जुनी इमारत अस्तित्वात नाही. शिवाय अस्तित्वात असलेले स्ट्रक्चरही हेरिटेज घोषित करण्याच्या दर्जाचे नसल्यामुळे तसेच या भागात प्रदर्शनासाठी वाफेचे इंजिन उपलब्ध होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ठाणे स्थानकाला हेरिटेजचा दर्जा देणे शक्य नसल्याचे रेल्वे बोर्डाच्या हेरिटेज विभागाकडून पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाण्यातील माहिती अधिकारासाठी काम करणारे कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी गेली दोन वर्षे यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु रेल्वे बोर्डाच्या समितीने त्यांना असा दर्जा देणे अशक्य असल्याचे कळवले आहे. ठाणे रेल्वे स्थानकात ऐतिहासिक अशा काही खुणा शिल्लक नाहीत. त्याचप्रमाणे बोरीबंदर ते ठाणे अशा धावलेल्या रेल्वेचे इंजिनही आता अस्तित्वात नाही. तसेच ठाणे रेल्वे स्थानकात असे इंजिन ठेवणे अशक्य असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने हेरिटेज समितीला कळविले होते.
मात्र, रेल्वे हेरिटेज समितीने मध्य रेल्वेला ठाणे रेल्वे स्थानकात डिजिटल म्युझियम उभारावे, अशी सूचना केली आहे. या डिजिटल म्युझियममध्ये ऐतिहासिक क्षणांची छायाचित्रे आणि पहिल्या रेल्वेविषयीची माहिती डिजिटल वॉलच्या स्वरुपात प्रदर्शित करावी अशा सूचना हेरिटेज समितीने मध्य रेल्वेला केल्या आहेत. ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील तिकीट खिडकीच्या भागात डिजिटल म्युझियमसाठी पहिल्या रेल्वे प्रवासाची काही छायाचित्रे बसवण्यात आले असून या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या जुन्या आठवणी या भागात उपलब्ध नाहीत.

- Advertisement -

100हून अधिक वर्षे जुन्या असलेल्या वास्तूंना हेरिटेजचा दर्जा असतो. त्यासाठी कोणत्या मागणीची गरज नसते. मात्र त्या वास्तूंची ऐतिहासिक साक्ष देणार्‍या गोष्टी जपल्या पाहिजेत. ठाणे रेल्वे स्टेशन जुनेच आहे. परंतु सुरुवातीला केवळ एकच प्लॅटफॉर्म असणार्‍या या स्टेशनचे आज 10 प्लॅटफॉर्ममध्ये रुपांतर झाले आहे. याचा अर्थ या स्थानकात सातत्याने बदल होत आहेत. येथे आता जुने म्हणता येईल असे काही राहिलेले नाही. त्यामुळेच कदाचित त्याला हेरीटेजचा दर्जा नाकारल्या गेला असावा. मात्र ठाणेकरांच्यादृष्टीने ते आजही हेरीटेजच आहे. कारण पहिली रेल्वे या ठाण्यात येऊन धडकली होती. त्यावेळचे इंजिन आणि प्लॅटफॉर्मचे फोटो किंवा इतर वास्तू ज्या सध्या अस्तित्वात आहेत, त्यांचे एक संग्रहालय निर्माण करणे आवश्यक असून त्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. – सदाशिव टेटविलकर, कार्यवाहक, कोकण इतिहास परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -