घरमुंबईग्रीट पावडरमुळे झाला 'तो' अपघात

ग्रीट पावडरमुळे झाला ‘तो’ अपघात

Subscribe

डोंबिवलीच्या दिशेने जात असताना खंबाळपाडा परिसरात झालेला अपघात हा ग्रीड पावडरमुळे झाला असल्याचे समोर आले आहे.

डंपर आणि बाईकच्या अपघातात आई वडीलासंह चिमुकलीला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी डोंबिवलीत घडली होती. मात्र, रस्त्यावरील ग्रीट पावडरमुळे बाईक घसरल्याने अपघात झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला असून याप्रकरणी संबधित अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी, मागणी करण्यात आली आहे. तसेच मृतांचे तेराव्याचे जेवण संबधित अधिकाऱ्यांना पाठविणार असल्याचे त्यांचे नातेवाईक भाऊ पाटील यांनी सांगितले आहे.

तेराव्याचे जेवण संबंधित अधिकाऱ्यांना पाठवणार

डोंबिवलीच्या दिशेने जात असताना खंबाळपाडा परिसरात डंपर आणि बाईकच्या अपघातात गणेश चौधरी, उर्मिला चौधरी या दाम्पत्यासह त्यांची चार वर्षांची चिमुकली हसिका हीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ओमला किरकोळ दुखापात झाल्याने सुदैवाने तो बचावला आहे. अपघातस्थळी रस्त्यावर असलेल्या ग्रीट पावडरमुळे चौधरी यांची बाईक घसरल्याने ते डंपरच्या खाली आले अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी चौधरी कुटूंबियांना दिली आहे. या माहितीच्या आधारे शुक्रवारी त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्यांना अपघात स्थळी ग्रीट पावडर पसरली असल्याचे दिसून आले. याठिकाणी गटाराचे काम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित ठेकेदाराने या ठीकाणी असलेली ग्रीट पावडर उचलली नाही, ती अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आली. दुचाकी याच ग्रीट पावडर वरून घसरल्याने अपघात झाला आणि या अपघातात तिघांचे बळी गेले असून या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. त्यामुळे या अपघातास संबंधित विभाग जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोपर स्थानकातील जीवघेणा प्रवास


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -