Coronavirus: एपीएमसी मार्केट शनिवारपासून सुरू होणार

टप्प्याटप्पाने हे मार्केट सुरु होणार आहे. यासह किराणा मालाच्या दुकानात भाजीपाला, अन्नधान्य पोहोचवण्यात येणार आहे.

Navi Mumbai
apmc market
एपीएमसी मार्केट शनिवारपासून सुरू होणार

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात येताच याचा संसर्ग टाळण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, वाशी येथील प्रचंड गर्दी होणारे एपीएमसी मार्केटही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र संपूर्ण देश लॉकडाऊन होण्याचा निर्णय घेण्यात आला असतानाही वाशी येथील एपीएमसी मार्केटशनिवारपासून सुरु होणार आहे. टप्प्याटप्पाने हे मार्केट सुरु होणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतील या गोष्टींबाबत नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

परराज्यातून येणारे सर्व सामान, उत्पादने सुरक्षित येण्यासाठी पोलीसांचे सहकार्य घेतले जाणार आहे. मार्केटमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठीदेखील काही महत्त्वाची पावले उचलण्यात येणार आहेत. बाजार समितीकडून सॅनिटायझर, टेंम्प्रेचर मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय किराणा मालाच्या दुकानात भाजीपाला, अन्नधान्य पोहोचवण्यात येणार आहे. मार्केट सुरु होणार असले तरीही येथे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. ज्या कारणी मार्केट हे टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे.


हेही वाचा – वयोवृद्ध, दिव्यांगांसाठी केडीएमसीची हेल्पलाईन; आवश्यक वस्तू मिळणार घरपोच

मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांवर बाजार समितीचे स्टीकर्स लावण्यात येणार आहेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहता कोकण आयुक्तांच्या निरिक्षणाअंतर्गत वॉर रूम तयार करण्याचे कामही सुरु आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here