मुस्लिमांच्या जुलूसला दिल्या जाणार सेवा सुविधा; पालिकेकडून २ कोटींची मान्यता

महापालिकेच्यावतीने गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाकरता सेवा सुविधा दिल्या जातात. त्याच धर्तीवर पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीदिनी जुलूससाठी सेवा सुविधा दिल्या जाणार आहेत.

Mumbai
order to policy make for RMC Plant in Mumbai
मुंबई महानगर पालिका

पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीदिनी ईद मिलद-उन-नबी निमित्त भायखळा खिलाफत हाऊस येथून निघणार्‍या जुलूससाठी मुंबई महापालिकेच्यावतीने सेवा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाकरता ज्याप्रमाणे सेवा सुविधा महापालिकेच्यावतीने दिल्या जातात. त्याच धर्तीवर जुलूससाठी महापालिकेच्यावतीने सेवा सुविधा देण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यास गटनेत्यांच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षांपासून या निधीची तरतूद करण्यात येणार असली तरी यावर्षी ई विभाग कार्यालयाच्या स्तरावर ही सेवा सुविधा पुरवली जाणार आहे.

आनंदाचे आणि उत्साहचे वातावरण 

पैगंबर मोहम्मद हे इस्लाम धर्माचे थोर धर्मगुरु होऊन गेले असून त्यांनी मुस्लिम समाजामध्ये समाज सुधारणेबरोबरच बंधुभाव, प्रेम, सद्भावना, आणि एकोप्याची शिकवण दिली. जगभरात पैगंबर मोहम्मद यांची जयंती मोठ्या आनंदात केली जाते. या जयंतीदिनी ईद मिलद-उन नबी निमित्त भायखळा खिलाफत हाऊस येथील दरवर्षी मोठ्या प्रमाणात जुलूसचे आयोजन करण्यात येते. या जुलूसमध्ये मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून मुस्लिम बंधू भगिनी आणि लहान मुले आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.

पैंगबर यांच्या जयंतीचे हे १०० वे वर्षे

पैंगबर यांच्या जयंतीचे हे १०० वे वर्षे असून रविवारी १० नोव्हेंबर रोजी ईद मिलद उन नबी निमित्त भायखळा खिलाफत हाऊस मदनपुरा, दोन टाकी, जे.जे. रुग्णालय मार्गे, कॉफर्डमार्केटपर्यंत मोठ्याप्रमाणावर जुलूसचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने पैगंबर यांच्या जीवनावर आधारित अनेक तैलचित्रे, देखावे आणि प्रतिकृतीचे रथ तयार करून या जुलूसमध्ये त्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वरांची मान्यता

सहा डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर मोठ्याप्रमाणात जमा होणार्‍या आंबेडकर अनुयायांसाठी, तसेच गिरगाव चौपाटीसह अनेक विसर्जन स्थळांवर गणेश भक्तांसाठी विविध सेवा सुविधा महापालिकेच्यावतीने राबवण्यात येतात. त्याचधर्तीवर १० नोव्हेंबर रोजी भायखळा येथील जुलूसमध्ये सहभागी होणार्‍या मुस्लिम बंधू भगिनींसाठी आरोग्य सुविधा, मोबाईल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची सुविधा, साफसफाई, अन्नाची पाकीटे आणि इतर सेवा सुविधा पुरवण्याबरोबरच भायखळा येथील जुलूसच्या मार्गावर पुष्पवृष्ठी केली जावी,अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी न केली होती. तसेच प्रत्येक वर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकांमध्ये या सेवा सुविधा पुरवण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्याचीही मागणी केली होती. त्यानुसार या पत्राला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मान्यता दिली होती.

गटनेत्यांच्या मान्यतेनंतर, गुरुवारी महापौरांच्या दालनात खिलाफत हाऊससंदर्भात मुस्लिम समाजाचे नेते, मौलाना, मुफ्ती आदींची बैठक झाली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सपाचे गटनेते आमदार रईस शेख आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मुस्लिम समाजाचे नेते, मौलांना आदींनी महापौरांसह स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here