‘आगामी निवडणूक ही संविधान विरुद्ध मनुस्मृती’

निवडणूक जवळ आल्या की, नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात. मग मोदी त्यांच्या पुतळ्यांना नमस्कार करतात, पण सत्तेत बसून बाबासाहेबांचे संविधान नष्ट करण्याचे उद्योग सुरु आहेत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

Mumbai
Mallikarjun Kharge
कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे

आगामी निवडणूक ही संविधान विरुद्ध मनुस्मृती असणार आहे, असे कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई कॉंग्रेसने संविधान बचाव परिषदचे आयोजन केले होते. यावेळी खर्गे म्हणाले की, निवडणूक जवळ आल्या की, नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात. मोदी यावेळी त्यांच्या पुतळ्यांना नमस्कार करतात, पण सत्तेत बसून बाबासाहेबांचे संविधान नष्ट करण्याचे उद्योग सुरु आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मनुवादाचा पराभव करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. या कार्यक्रमात संजय निरुपम, राम पंडागळे, खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची भाषणे झाली. तर कॉंग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा आणि प्रिया दत्ता अनुपस्थित होते. विशेष म्हणजे हा कार्यक्रम प्रिया दत्त यांच्या मतदार संघात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या न येण्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा – राम कदमच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?

मल्लिकार्जुग खर्गे म्हणाले की, संविधानामुळे देशातील अस्पृश्यता संपली आहे. मनुस्मृतीचे रक्षण करायचे की, संविधानाचे याचा निर्णय २०१९च्या निवडणूकीने होणार आहे. भाजप सरकारच्या चार वर्षाच्या काळात महिला, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचारात वाढ झाली आहे. कॉंग्रेसने कायम व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला. भाजपच्या काळात काही विकास तर झालाच नाही, मात्र हुकूमशाही पद्धतीने निवडणूक आयोग, सीबीआय, आरबीआय यांची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे भाजपला हरवण्याचे उद्दीष्टे सर्वांनी डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे, असे आवाहन खर्गे यांनी केले.

हेही वाचा – भगवद्गीतेवर ‘आव्हाड’ सोशल मीडियावर ट्रोल

देशाच्या नीतीमुल्यांवर रोज हल्ले होत आहेत – निरुपम

या कार्यक्रमात भाषण करताना कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, संविधान भारताचा जीव आहे. आणि आता त्याचा जीव अडचणीत सापडला आहे. देशाच्या नीतीमुल्यांवर रोज हल्ले होत आहे. काय बोलायचे, काय खायचे, काय कपडे घालायचे हे सरकार ठरवत आहे. दलित, विद्यापीठ,व्यापारी वर्ग, सीबीआय यांच्यावर रोज हल्ले होत आहेत. त्यामुळे आता संविधान वाचवण्यासाठी विद्रोहाची वेळ आल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर संविधान वाचवण्यासाठी दिवाळीनंतर मुंबई कॉंग्रेस आक्रमक आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.


हेही वाचा – अधिवेशन थांबवून मुख्यमंत्र्यांनी मुंबईत यावं

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here