घरमुंबईजुहू येथील नामांकित हॉटेलमध्ये चालणार्‍या जुगाराचा पर्दाफाश

जुहू येथील नामांकित हॉटेलमध्ये चालणार्‍या जुगाराचा पर्दाफाश

Subscribe

52 महिलांसह 135 जणांना अटक

मुंबई:-जुहू येथील एका नामांकित हॉटेलमध्ये सोमवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून तिथे चालणार्‍या जुगाराचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात 52 महिलांसह 135 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांना नंतर सांताक्रुज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून निमंत्रण

व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून अनेकांना तिथे जुगारासाठी निमंत्रण पाठविण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सांताक्रुज येथील एका नामांकित हॉटेलमध्ये जुगाराचा अड्डा सुरु असून तिथे लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती जापू विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी जापू पोलिसांच्या एका विशेष पथकाने जुहू पोलिसांच्या मदतीने तिथे छापा टाकला होता. या छाप्यात तिथे चालणार्‍या एका हायफाय जुगाराचा अड्ड्याचा पर्दाफाश केला.

- Advertisement -

३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

या जुगाराचा आयोजकासह दोन कॅशिअर, जॉकी, बॉडीगार्ड आणि इतर कर्मचारी, जुगार खेळणारे 63 पुरुष, 52 महिला अशा 135 जणांना नंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी पावणेचार लाख रुपयांची कॅश आणि तीन हजार तीनशे रुपयांचे कॉईन असा 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या 52 महिलांना नंतर नोटीस देऊन घरी पाठविण्यात आले.

सर्वांविरुद्ध गुन्हा

रात्री उशिरापर्यंत या सर्वांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या सर्वांना नंतर सांताक्रुज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -