घरमुंबईदरोडेखोर-पोलिसांचा एकमेकांवर गोळीबार

दरोडेखोर-पोलिसांचा एकमेकांवर गोळीबार

Subscribe

वाघोबा खिंडीत सशस्त्र दरोडेखोरांनी दगडफेक, गोळीबार करून पोलिसांवर हल्ला केला. प्रतिकार करताना पोलीसांनी देखील आपल्या रिव्हॉल्वरमधून दरोडेखोरांना गोळ्या झाडल्या.

पालघरच्या वाघोबा खिंडीत सशस्त्र दरोडेखोरांनी दगडफेक, गोळीबार करून पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत गोळीबार केल्याने एक दरोडेखोर जखमी झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पालघर ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री ही धडक कारवाई केली. पालघर-मनोर रस्त्यावरील वाघोबा खिंडीत दरोडा पडण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटण्याची पद्धत दरोडेखोरांकडून अवलंबली जात आहे. गुरुवारी रात्री ९.४५  च्या दरम्यान ९ दरोडेखोरांनी येथून जाणाऱ्या दोन चारचाकी आणि एका दुचाकीने जाणाऱ्यांवर दगडफेक केली आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. वाहनचालक ग्रामस्थांनी दरोडेखोरांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर त्यांच्याबरोबर पोलीस निरिक्षक किरण कबाडी आपल्या पथकासह घटनास्थळी गेले.

वाघोबा खिंडीत थरार

- Advertisement -

पोलीस निरिक्षक किरण कबाडी यांनी त्यांच्या पथकासोबत दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र सशस्त्र दरोडेखोरांनी पोलिसांवरच गोळीबार केला. त्यामुळे प्रतिकार करत कबाडी आणि उपनिरिक्षक पवार यांनी आपल्या रिव्हॉल्वरमधून दोन-दोन गोळ्या झाडल्या. त्यात एक दरोडेखोर जखमी झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, यावेळी अंधाराचा फायदा घेत इतर दरोडेखोर डोंगरभागात पसार झाले. पोलिसांची जादा कुमक मागवून डोंगरावर दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. तर या घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या दोन स्थानिक वार्ताहरांवरही सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे पालघरमधील पत्रकारांकडून संताप व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -