घरलोकसभा २०१९जरा हटकेईशान्य मुंबईतून तृतीयपंथी उमेदवार; एकेकाळी नगरसेवकाच्या घरी भांडी घासली

ईशान्य मुंबईतून तृतीयपंथी उमेदवार; एकेकाळी नगरसेवकाच्या घरी भांडी घासली

Subscribe

ईशान्य मुंबईतून तृतीयपंथी उमेदवार देणार टक्कर

कुटुंबाला किन्नर समाजातली माझी ओळख पसंत नव्हती. कुटुंब सोडावे लागले, त्या घटनेला आता २७ वर्षे झाली. स्वतःच्याच हिमतीवर अकरावीपर्यंत शिक्षण घेतले. पण दरम्यानच्या काळात पोट भरण्यासाठी नगरसेवकाच्या घरी भांडी घासण्याचे कामही केले. अनेकदा चणे खाऊन पोटाची भूक भागवली. समाजात तृतीयपंथी म्हणून आलेला सगळा अनुभवातून आता हक्काची लढाई करायची आहे. त्यासाठी दुर्बल घटक आघाडीच्या माध्यमातून यंदा जोगती तृतीयपंथी असलेल्या जतीन मम्मी ईशान्य मुंबईतून निवडणुक लढवणार आहे. तृतीयपंथीयांनी आणखी किती दिवस आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी सरकार दरबारी कुठवर मागायच असा सवाल जतीन मम्मी यांनी केला आहे.

राज्यसभेवरील कला आणि क्रीडा क्षेत्रातील खासदार हे आपल्या मागण्यांसाठी विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. आमच्या मागण्याही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून संसदेत ठोसपणे मांडल्या जाव्यात यासाठीच लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षासोबत न जाता समाजासाठी काम करायचे म्हणून विलास रूपवते यांच्या नेतृत्वात दुर्बल घटक आघाडी लोकसभा निवडणुकीत ७ उमेदवार लढवणार आहे. आतापर्यंत शासनाची भूमिका ही किन्नर तसेच देवदासी समाजासाठी हीन अशा स्वरूपाची राहिली आहे. भीक मागणे हा गुन्हा आहे असे राज्य सरकार म्हणते तेव्हा राज्य सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा अशीही भूमिका त्यांनी मांडली आहे.

- Advertisement -

संपुर्ण महाराष्ट्रात वाढलेला किन्नर, जोगती, देवदासी, वाघ्या मुरळी, डवरी असा समाज हा मुख्यत्वेकरून आमचा मतदार आहे. त्याशिवाय टॅक्सी चालक, नाका कामगार, घरेलु कामगार यांच्यासारखी कष्टकरी समाजही आमचा मतदार असेल असे जतीन मम्मी यांनी सांगितले. दुर्बल घटक आघाडीने आपला जाहीरनामा मांडला असून या जाहिरनाम्यात तृतीयपंथी समाजाला २ हजार रूपये पेंशन, पिवळी शिधापत्रिका, उदरनिर्वाहाच साधन तसेच हमखास रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र देवदासी निराधार संघटनेच्या निमित्ताने याआधी राज्यभर दौरा केला होता. अवघ्या ८ जणांच्या माध्यमातून सुरू झालेल्या संघटनेचे आता राज्यात ८ लाख सदस्य झाले आहेत. आतापर्यंत विविध राजकीय पक्षांना आम्ही निवडणुकीत प्रचारासाठी मदत केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांच्यासाठी मदत केली होती. पण यंदा लोकसभेसाठी ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीचे संजय पाटील आणि भाजपच्या उमेदवाराचे आव्हान जतीन मम्मी यांच्यासमोर असणार आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -