घरमुंबईपालकांनो मुलांकडे लक्ष द्या; लहान मुलीने गिळले ५ रुपयाचे नाणे

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या; लहान मुलीने गिळले ५ रुपयाचे नाणे

Subscribe

लहान मुलांनी खेळण्याचे छोटे बॅटरी (सेल), सेफ्टी पिन तसेच पैशाची नाणी गिळण्याच्या घटना आतापर्यंत अनेकदा घडल्या आहेत. यावर कधीकधी योग्य उपचार न मिळाल्यामुळे अशा मुलांचा अपघाती मृत्यू होतो. गेल्याच आठवड्यात योग्य आणि तात्काळ वैद्यकीय उपचारांमुळे दहिसर येथील एका तीन वर्षाच्या मुलीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. दहिसर येथे राहणारी तीन वर्षांची शिखा बनसोडे (बदललेले नाव) हिने घरामध्ये खेळता खेळता पाच रुपयाचे नाणे गिळले होते. त्यामुळे तिला बोलायला आणि श्वास घेण्यास अडथळा होण्यास सुरुवात झाली.

सकाळची वेळ असल्यामुळे तिचे वडील घरी होते. त्यामुळे त्यांनी तात्काळ बोरीवलीच्या अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केले. अपेक्स सुपर स्पेशालिटी मधील गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. राजीव हिंगोरानी आणि त्यांच्या टीमने लगेचच उपचार सुरु केले आणि आपत्कालीन एन्डोस्कोपी प्रक्रिया करून पाच रुपयाचे नाणे यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले. अन्ननलिकेवाटे नाणे बाहेर काढताना ते श्वास नलिकेत जाऊ नये याची विशेष खबरदारी डॉक्टरांना घ्यावी लागली.

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. राजीव हिंगोरानी यांनी सांगितलं की, ” अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने पाच रुपयाचे नाणे यशस्वी उपचार करून बाहेर काढले त्यामुळे या चिमुकलीला जीवदान मिळाले असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. अशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत पण, काही प्रकरणांत मुलांनी गिळलेल्या वस्तू आपोआप बाहेर येतील याची पालक वाट बघतात. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. मुल ६ वर्षाचे होईपर्यंत पालकांनी विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. ग्रामीण भागात अनेकवेळा हॉस्पिटल दूर असल्यामुळे अशा घटनांमध्ये मुलांचा जीव जातो. पण, शहरी भागांमध्ये सुद्धा अशा घटना वाढत असून वेळ न घालवता हॉस्पिटलमध्ये पोहचणे महत्वाचे आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -