भांडुपमध्ये झाड कोसळून दोन जण जखमी

भांडुप येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर झाड कोसळून दोन जण जखमी

Mumbai
tree fall at bhandup
भांडुपमध्ये झाडं कोसळून दोन पादचारी जखमी

भांडुप येथे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना भांडुप येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून जखमींना मुलुंडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निश्मन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. रस्त्याच्यामध्येच झाड कोसळल्याने मुंलुडपासून घाटकोपर पर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here