उल्हासनगरमध्ये ‘नो हॉर्न प्लिज’ची पोलिसांकडून जनजागृती

पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, हिराली फाउंडेशनचे पुरुषोत्तम खानचंदानी- सरिता खानचंदानी या दाम्पत्याच्या पुढाकाराने उल्हासनगरात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी 'नो हॉर्न प्लिज' कॅम्पेनचे आयोजन करण्यात आले.

Mumbai
No Honking Campaign
नो हॉर्न प्लिज'ची पोलिसांकडून जनजागृती

पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, हिराली फाउंडेशनचे पुरुषोत्तम खानचंदानी- सरिता खानचंदानी या दाम्पत्याच्या पुढाकाराने उल्हासनगरात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी ‘नो हॉर्न प्लिज’ कॅम्पेनचे आयोजन करण्यात आले. आज, २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सिंधू एज्युकेशन सोसायटी,स्वामी हंसमुनी कॉलेजमध्ये शांति उत्सव, “No Honking Campaign”नावाने आयोजित केलेल्या या कॅम्पेन मध्ये पोलीस अधिकारी विद्यार्थी-विद्यार्थीनी-व्यापारी-नागरिक यांनी नो हॉन्किंगची शपथ घेतली.

सामाजिक कार्यकर्ते उपस्थित 

पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलिस आयुक्त ट्रॅफिक प्रदीप गोसावी, सहाय्यक पोलिस आयुक्त डी डी टेले, सुनील पाटील, उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे, मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर,विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, हिललाइन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश मायने, ट्रॅफिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिदास पवार तसेच अंबरनाथ-बदलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंधु एजुकेशन सोसायटीच्या सचिव रेखा ठाकुर, भावना छाबरिया, प्राचार्या किरण चिमनानी आदी यावेळी उपस्थित होते.