घरमुंबई'आयोध्या निकालाप्रकरणी' मुंबईत जमावबंदीचे आदेश

‘आयोध्या निकालाप्रकरणी’ मुंबईत जमावबंदीचे आदेश

Subscribe

'आयोध्या निकालाप्रकरणी' मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आल आहे. सीआरपीसी कायद्याच्या कलम 144 अंतर्गत हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागला आहे. या खटल्याची सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सलग ४० दिवस सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं १६ ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता. आज या खटल्याचा अंतिम निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत शांतता राखली जावी यासाठी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. उदया सकाळी ११ वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे.

अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आपला ऐतिहासिक निकाल दिला देणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. देशातील हा ऐतिहासिक निकाल असून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही अफवा पसरवू नये असे आवाहनही महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यत येत आहे. शनिवारी 11 वाजल्यापासून मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे.सीआरपीसी कायद्याच्या कलम 144 अंतर्गत हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

- Advertisement -

त्याचप्रमाणे शहरातील धार्मिक स्थळांसह धार्मिक तेढ निर्माण होईल अशी संवेदनशील ठिकाणे शोधून पोलिसांनी याठिकाणच्या बंदोबस्तात वाढ केली असून पोलिसांनी व्हॉटसअ‍ॅप, फेसबूक, ट्वीटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मिडियावर करडी नजर ठेवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -