घरमुंबईठाणे शहराला ६ दिवस होणार कमी दाबाने पाणी पुरवठा!

ठाणे शहराला ६ दिवस होणार कमी दाबाने पाणी पुरवठा!

Subscribe

ठाण्यात एकूण ६ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

भातसा नदीच्या पाण्याची पातळी वाढवण्याकरता बसविण्यात आलेल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती दिनांक ३ डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. ठाणे महानगरपालिका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथे भातसा नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. त्याद्वारे या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. याच बंधाऱ्यावर नदीच्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी न्यूमॅटिक गेट सिस्टीम बसव्यात आली आहे. तिथेच मुबई महानगर पालिकेकडून दुरुस्ती केली जाणार आहे.

पाण्याची पातळी कमी होणार

न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात येणार असून या कालावधीत पिसे येथील उदंचन केंद्रात पाण्याची पातळी कमी केली जाणार आहे. तरी सदर कालावधीत ठाणे महानगरपालिकेला कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार असल्याने ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाण्यात ग्राहकाच्या खोट्या सहीने खाजगी कंपनीची स्मार्ट पाणी मीटर जोडणी!

या परिसरात १० टक्के कपात

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नौपाडा-कोपरी, टेकडी बंगला, किसननगर आणि हाजुरी या परिसरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य प्रकारे वापर करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -