घरमुंबईबहुजन विकास आघाडीची शिट्टी जाणार?

बहुजन विकास आघाडीची शिट्टी जाणार?

Subscribe

बहुजन महापार्टीच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडीला शह ,शिवसेना-भाजपची पालघरमध्ये फिल्डींग

 बहुजन विकास आघाडीचा सहयोगी दल असलेला बहुजन महापार्टी आघाडीतून बाहेर पडला असून यापुढे आघाडीसोबत न राहता आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार असल्याची माहिती 2 एप्रिल रोजी बहुजन महापार्टीचे राष्ट्रीय महासचिव शमशुद्दीन खान यांनी ठाण्यात दिली. निवडणूक चिन्ह शिट्टीची ओळख पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीची असल्याने आता हे चिन्ह न राहिल्यास याचा फटका आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

शिट्टी हे निवडणूक चिन्ह बहुजन महापार्टी यांना याआधी मिळाले होते. त्यामुळे आता बहुजन विकास आघाडीला वेगळ्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे याचा फायदा सेना-भाजपला होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात आहे. बहुजन महापार्टीने ठाण्यात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांसह विकास रेपाळे उपस्थित असल्याने यामागच्या राजकारणाची चर्चा ठाणेकरांमध्ये रंगली आहे.

- Advertisement -

बहुजन विकास आघाडीचे निवडणुक चिन्ह शिट्टी जनमानसात रुजले आहे. मागील अनेक निवडणुकीत या चिन्हावर बहुजन विकास आघाडी विजयी झाली आहे. तर काही वेळा निसटता पराभव झाला आहे. शिट्टीला मत म्हणजे बहुजन विकास आघाडीला मत हे समीकरण झाले होते. मात्र हे बदलण्याकरता बहुजन महापार्टीला वेगळे करण्याचा डाव रचण्यात आल्याची चर्चा पालघर जिल्ह्यात होत आहे. या लोकसभा निवडणुकीत सेनेने आयात केलेला भाजपच्या उमेदवारावरून सुरू असलेला अतंर्गत वादाचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. त्याकरिता ही राजकीय खेळी करण्यात आली असल्याचे निवडणूक विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बहुजन महापार्टी हा पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तसलीमुन्नीसा खान या आहेत. बहुजन महापार्टीचे शिट्टी हे अधिकृत चिन्ह आहे. भारतीय निवडणूक आयोगाने 21 डिसेंबर 2018 रोजी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 29 पक्षांसाठी अधिकृत चिन्ह असल्याचे जाहीर केले आहे. या शिट्टी निवडणूक चिन्हावरच मागील काही निवडणुका बहुजन विकास आघाडीने जिंकल्या आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत हे चिन्ह गेल्यामुळे बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

- Advertisement -

बहुजन महापार्टी ही महाराष्ट्रात बहुजन विकास आघाडीबरोबर निवडणुकीत स्थानिक पातळीवर आजवर आघाडी करत आलेली आहे. पालघर लोकसभा मतदासंघातही स्थानिक पातळीवर आघाडी जाहीर केली होती. मात्र राष्ट्रीय कोअर कमिटीला स्थानिक पातळीवर आघाडी मान्य नसल्याने राष्ट्रीय अध्यक्ष तसलीमुन्नीसा खान यांनी 29 मार्च रोजी मला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, त्यामुळेच आघाडीबरोबर फारकत घेण्यात आली आहे.
-शमशुद्दीन खान, महासचिव बहुजन महापार्टी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -