घरमुंबईपार्किंगच्या वादातून तरुणाला मारहाण; वकिलासह रेल्वे कर्मचाऱ्याला अटक

पार्किंगच्या वादातून तरुणाला मारहाण; वकिलासह रेल्वे कर्मचाऱ्याला अटक

Subscribe

रेल्वे तिकीट घराजवळ मोटारसायकल उभी करण्यास मनाई करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) एका जवानाला एका वकीलासह रेल्वे कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्करणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

रेल्वे तिकीट घराजवळ मोटारसायकल उभी करण्यास मनाई करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) एका जवानाला एका वकीलासह चार जणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना दोन दिवसापूर्वी हार्बर मार्गावरील टिळक नगर येथे घडली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या जवानाला त्याच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरिक्षक विलास शिंदे यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक जण वकील असून दुसरा रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल कादिर अब्दुल अजीज अन्सारी (३१) आणि इरफान अब्दुल अजीज अन्सारी (२८) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नवे असून दोघेही सख्खे भाऊ आहेत.

नेमके काय घडले?

अब्दुल कादिर हा रेल्वे कर्मचारी असून इरफान हा वकील आहे. शुक्रवारी सायंकाळी अब्दुल कादिर हा मोटारसायकल घेऊन टिळक नगर रेल्वे स्थानक तिकीट घराजवळ आला. त्याने तिकीट घराजवळ आपली मोटारसायकल उभी करून जात असताना तेथे कर्त्यव्यावर असलेल्या शंकर आव्हाड (३०) या एमएसएफच्या जवानाने त्याला अडवले आणि मोटारसायकल पार्क करण्यास मनाई केली. दरम्यान अब्दुल कादिर आणि एमएसएफच्या जवानांमध्ये शाब्दिक वाद झाला असता अब्दुल कादिर याने फोन करून आपल्या भावाला आणि नातेवाईकांना तेथे बोलावून घेतले. चौघांनी मिळून एमएसएफच्या जवानाला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथील प्रवाशी आणि रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांनी चौघांच्या तावडीतून एमएसएफच्या जवानांची सुटका करून त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अब्दुल कादिर अब्दुल अजीज अन्सारी आणि इरफान अब्दुल अजीज अन्सारी या दोघाभावांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

Video: तिने पगार मागितला म्हणून केली भररस्त्यात मारहाण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -