Photo – तिसऱ्या दिवशीही सिटी सेंटर मॉलमधील आग धुमसतीच!

मुंबई सेंट्रल परिसरात सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेली आग आज तिसऱ्या दिवशीची धुसमत आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमध्ये मॉलचे दोन मजले पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या या ठिकाणी १४ पाईपलाईनच्या मदतीने आणि दोन मोठ्या शिडीच्या सहाय्याने मॉलच्या बाहेरुन सातत्याने पाण्याचा मारा सुरु आहे. मात्र मॉलमध्ये असलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि दुकानातील लाकडी फर्निचर यामुळे ही आग अजूनही धुमसत आहे. (सर्व छाया - दीपक साळवी)