करोनाच्या भीतीपोटी लोकांची गावाकडे धाव

Mumbai

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जमावबंदी लागू केली आहे. काही शहरे अंशत: लॉकडाऊन आहेत. सरकारने अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन केले आहे. मात्र, अनेक ठिकाणी सरकारच्या आदेशाला हरताळ फासत रेल्वे स्थानकावर गर्दी करण्यात आली आहे. तर काहींनी या आदेशाचे काटेकोरपणे पालण केले आहे.