घरक्रीडाअफगाणिस्तानचा ऐतिहासिक कसोटी विजय

अफगाणिस्तानचा ऐतिहासिक कसोटी विजय

Subscribe

रेहमत शाहच्या सामन्यातील दुसर्‍या अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने एकमेव कसोटी सामन्यात आयर्लंडवर ७ विकेट राखून मात करत कसोटी क्रिकेटमधील आपला पहिला विजय मिळवला. हा सामना जिंकण्यासाठी आयर्लंडने चौथ्या डावात दिलेल्या १४७ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची पहिली विकेट ५ धावांवरच पडली. मात्र, यानंतर सलामीवीर एहसानउल्लाह (नाबाद ६५) आणि रेहमत शाह (७६) यांनी दुसर्‍या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली.

विजयासाठी ४ धावांची गरज असताना रेहमत आणि त्यानंतर ३ धावांची गरज असताना मोहम्मद नबी (१) बाद झाला. मात्र, हशमतउल्लाह शाहिदीने चौकार लगावत अफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेटमधील पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
डेहरादून येथे झालेल्या या कसोटी सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यामिन अहमदझाई आणि मोहम्मद नबीने ३-३ विकेट घेतल्यामुळे आयर्लंडला पहिल्या डावात १७२ धावाच करता आल्या.

- Advertisement -

आयर्लंडची ९ बाद ८५ अशी अवस्था होती. मात्र, जॉर्ज डॉकरेल (३९) आणि टीम मर्था (नाबाद ५४) या अखेरच्या जोडीने ८७ धावांची भागीदारी करत आयर्लंडची धावसंख्या १७२ पर्यंत नेली. अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या डावात ३१४ धावा करत १४२ धावांची आघाडी मिळवली. अफगाणिस्तानकडून रेहमत शाह (९८), असघर अफगाण (६७) आणि हशमतउल्लाह शाहिदी (६१) यांनी चांगली फलंदाजी केली. आयर्लंडने आपल्या दुसर्‍या डावात २८८ धावा केल्या. आयर्लंडच्या अँडी बालबर्नीने या डावात ८२ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून राशिद खानने ५ विकेट घेतल्या. कसोटी सामन्याच्या एका डावात ५ विकेट घेणारा राशिद हा पहिला खेळाडू ठरला.

संक्षिप्त धावफलक –

- Advertisement -

आयर्लंड : १७२ आणि २८८ पराभूत वि. अफगाणिस्तान : ३१४ आणि ३ बाद १४९ (रेहमत शाह ७६, एहसानउल्लाह नाबाद ६५; जेम्स कॅमरुन-डोव १/२४).

कसोटी क्रिकेटसाठी लागणारा संयम आमच्यात आहे- असघर

या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार असघर अफगाण म्हणाला, हा अफगाणिस्तानसाठी ऐतिहासिक दिवस आहे. आम्ही आता क्रिकेट खेळायला लागल्यापासून बराच काळ झाला आहे. आम्ही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहोत, त्यामुळे कसोटी क्रिकेटसाठी लागणारा संयम आमच्यात आहे. या सामन्यात राशिद (खान), यामिन (अहमदझाई) या गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. आता विश्वचषकाच्या तयारीसाठी आम्ही द.आफ्रिकेला जाणार आहोत. आमचा सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यावरच नेहमी भर असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -