घरक्रीडाबंगळुरूचा हैदराबादवर दणदणीत विजय, प्ले ऑफला जाण्याची संधी!

बंगळुरूचा हैदराबादवर दणदणीत विजय, प्ले ऑफला जाण्याची संधी!

Subscribe

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी २१८ धावांचे लक्ष ठेवले. बंगळुरूच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ ३ विकेट्स बदल्यात २० षटकांत २०४ धावाच करु शकला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने सनरायझर्स हैदराबादच्या संघावर १४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

ए. बी. डिव्हिलिअर्सची फटकेबाजी

एबी-मोईनची तुफान फटकेबाजी
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, कोहलीच्या संघातील एबी डिव्हिलियर्स, मोईन अली आणि कॉलिन डी-ग्रँडहोम यांनी मधल्या फळीत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरुने घरच्या मैदानावर २१८ धावा केल्या. सलामीवीर पार्थिव पटेल आणि विराट कोहली झटपट माघारी केले. मात्र हैदराबादचे गोलंदाज नंतर सपशेल अपयशी ठरले. डिव्हिलियर्स आणि मोईन अली या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीमुळे बंगळुरुला २०० धावांचा टप्पा पार करता आला.

- Advertisement -

ग्रँडहोमने नेलं दोनशेपार
डिव्हिलियर्स-मोईन अली माघारी परतल्यानंतर कॉलिन डी ग्रँडहोमने किल्ला लढवत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. हैदराबादकडून राशिद खानने ३, सिद्धार्थ कौलने २ तर संदीप शर्माने एक विकेट घेतली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ

प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत
बंगळुरुसाठीचा घरच्या मैदानावर झालेला हा या सीजनमधला शेवटचा सामना होता. अपेक्षेप्रमाणे त्यांनी हा सामना जिंकून आपल्या चाहत्यांची मनेही जिंकली. या विजयामुळे प्ले ऑफमध्ये जाण्याच्या बंगळुरुच्या आशा कायम राहिल्या आहेत.

- Advertisement -
ए. बी. डिव्हिलिअर्सचा अप्रतिम झेल

डिव्हिलिअर्सचा थक्क करणारा झेल !
बंगळुरुचा अष्टपैलू खेळाडू ए. बी. डिव्हिलिअर्सने हैदराबादच्या अॅलेक्स हेल्सचा घेतलेला झेल हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट झेल असल्याची प्रतिक्रिया क्रिकेटप्रेमी देत आहेत. हा सामना प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रेक्षकांसाठी हा एक अविस्मरणीय झेल ठरला. अॅलेक्स हेल्सने पाय क्रीझ बाहेर काढून मोईन अलीचा चेंडू टोलवला. मात्र, उंचावरून जाणारा हा झेल डिलिव्हिअर्सने हवेत झेपावत एका हाताने अप्रतिमरित्या घेतला.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -