घरक्रीडादादा खानोलकर स्मृती एसपीजी टेनिस स्पर्धा १ मार्च २०२०

दादा खानोलकर स्मृती एसपीजी टेनिस स्पर्धा १ मार्च २०२०

Subscribe

शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे (एसपीजी) टेनिसपटू व संघटक दादा खानोलकर स्मृती एसपीजी टेनिस स्पर्धा १ मार्च रोजी दादर-पश्चिम येथील एसपीजी टेनिस कोर्टवर आयोजित करण्यात आली आहे. Si सायबर हे मुख्य प्रायोजक असून General Instruments consortium आणि Aditya Chougule Tennis Academy हे सहप्रायोजक आहेत. हि टेनिस स्पर्धा सलग चौथ्या वर्षी दुहेरी गटात खेळविली जाणार असून टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक यांच्यासाठी मर्यादित आहे. टेनिसमधील मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक हे महत्वाचे दोन घटक स्पर्धेपासून वंचित होत असल्यामुळे शिवाजी पार्क जिमखान्याने स्पर्धेचे सातत्य राखले आहे. दुहेरीचे स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्यामुळे दादा खानोलकर यांच्या टेनिस कर्तुत्वाला शोभेल, अशा दर्जेदार आयोजनात टेनिस स्पर्धा पार पाडली जाणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी ट्रॉफी, व एकूण रु.४०,०००/- रक्कमेचे पुरस्कार आहेत. अंतिम विजेत्यास दादा खानोलकर स्मृती चषक व रुपये बारा हजाराचे बक्षीस व उपविजेत्यास दादा खानोलकर स्मृती चषक व रुपये दहा हजारचे बक्षीस दिला जाणार आहे. इतरही स्पर्धकांना योग्य बक्षिसे दिली जातील.

- Advertisement -

टेनिस रसिकांनी या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद देतांना विशेषतः युवा वर्गाने टेनिस मार्कर अथवा सहाय्यक प्रशिक्षकाच्या सेवेस करिअर म्हणून पाहावे, हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्‍या संबंधित खेळाडूंनी प्रवेशासाठी अथवा अधिक माहितीसाठी संजय पटेल ९८२०२ ४१३५१, शिवाजी पार्क जिमखाना, दादर-पश्चिम, मुंबई – ४०० ०२८ यांच्याकडे २८ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी १० ते सायं. ५ वा. दरम्यान संपर्क साधावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -