घरक्रीडाहिमानं रचला नवा इतिहास

हिमानं रचला नवा इतिहास

Subscribe

४०० मीटर प्रकारात अंतिम फेरी जिंकून हिमानं सुवर्णपदक मिळवून नवा इतिहास रचला. जागतिक स्पर्धेत ४०० मीटर प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळवणारी हिमा पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.

भारतीय रनर हिमा दासनं नवा इतिहास रचला असून २० वर्षांखालील वर्ल्ड अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. ४०० मीटर प्रकारात अंतिम फेरी जिंकून हिमानं हे सुवर्णपदक मिळवून नवा इतिहास रचला. जागतिक स्पर्धेत ४०० मीटर प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळवणारी हिमा पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. आसामच्या नागाव जिल्ह्यातील एका छोट्याशा ढिंग गावातील १८ वर्षीय मुलीनं हा विक्रम आपल्या नावे केला आहे. हिमानं हे ४०० मीटर अवघ्या ५१.४६ सेकंदामध्ये पार केलं आहे. तर बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीतही तिनं हे अंतर ५२.१० सेकंदामध्ये पार केलं होतं. पहिल्या फेरीतही तिनं ५२.२५ सेकंदात अंतर कापून वर्चस्व राखलं होतं. हिमा दासपूर्वी जागतिक स्तरावर कोणत्याही महिलेनं सुवर्णपदक आतापर्यंत मिळवलेलं नाही.

कोण आहे हिमा?

आसामच्या नागाव जिल्ह्यातील एका छोट्याशा ढिंग गावात हिमाचा जन्म झाला. तिच्या वडिलांच्या भाताच्या शेतातच तिचं प्रशिक्षण झालं आहे. मात्र गेल्या वर्षीपासूनच तिनं रेसिंगमधील सहभाग गंभीरपणे घेतला होता. या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्ये हिमानं सहावा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी तिनं ४०० मीटरचं हे अंतर ५१.३२ सेकंदामध्ये पार केलं होतं. या खेळानंतर सातत्यानं तिची कामगिरी उंचावत गेली. दरम्यान तिनं नुकतंच आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. तर आता जागतिक स्तरावर सुवर्णपदक मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या कामगिरीनंतर तिनं नीरज चोप्राच्या कामगिरीसह बरोबरी केली आहे. नीरज चोप्रानं २०१६ मध्ये पोलंडमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. तर, या श्रेणीतील सर्वप्रथम भारतीय महिला हा मानदेखील तिनं प्राप्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -