घरक्रीडाहिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन

Subscribe

हिंदकेसरी विजेते कुस्तीपटू गणपतराव आंदळकर यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

हिंदकेसरी विजेते कुस्तीपटू गणपतराव आंदळकर यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. पुण्याच्या जोशी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी सकाळी कोल्हापुरात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

गणपतराव आंदळकर यांनी १९६० मध्ये हिंदकेसरी स्पर्धा जिंकली होती. १९६२ एशियाडमध्ये त्यांनी २ पदके जिंकली होती. कुस्तीच्या ग्रीको-रोमन प्रकारात सुवर्ण तर फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये त्यांना रौप्य पदक मिळाले होते. १९६४ ऑलिम्पिकमध्येही त्यांचा सहभाग होता. या त्यांच्या कामगिरीमुळे १९६४ साली त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले. तसेच १९८२ साली त्यांना शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. त्यामुळे त्यांच्या निधनाने भारतीय कुस्तीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -