घरमनोरंजनरजनी, अक्षयच्या २.० चा टीझर आला पण पुढे काय?

रजनी, अक्षयच्या २.० चा टीझर आला पण पुढे काय?

Subscribe

सुपरस्टार रजनिकांत आणि बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित २.० चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला. मात्र त्यात चित्रपटाच्या रिजिलजी तारीख देण्यात आलेली नाही.

सुपरस्टार रजनिकांत आणि बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित २.० चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला. मात्र त्यात चित्रपटाच्या रिजिलजी तारीख देण्यात आलेली नाही. त्यामुळे बॉलिवूडकरांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता कायम आहे. येत्या दिवाळीत २.० प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाचे काही तांत्रिक काम करण्याचे अजून राहिले असल्यामुळे ही कामे पूर्ण झाल्यानंतरच हा आधुनिक तंत्रपट सिनेमागृहात दाखल होईल. आतापर्यंत जवळपास दोन कोटी ३० लाख वेळा हा टिझर पाहिला गेला आहे. यात एक महाकाय गरुडसदृश्य पक्षी अवकाशातून पृथ्वीवर येतो. त्यावेळी नागरिकांच्या हातातले सेलफोन हातातून सटकून अवकाशात जाऊ लागतात. असं का होतं, याचं उत्तर दिवाळीत मिळेल. यातल्या खलनायकी पक्ष्याशी दोन हात करण्यासाठी रोबोटमधल्या चिट्टीला पुन्हा तयार केले जाते.

- Advertisement -

चित्रपटाच्या वीएफएक्सचे काम पूर्ण झाल्यावर २.० दिवाळीत भेटीला येईल. या महाकाय पक्षाचं नियंत्रण अक्षय कुमारकडे असते. तर त्याला नियंत्रणात आणण्याचे काम रजनीकांत अर्थात चिट्टी रोबोटला करावं लागतं. अत्यंत महागडे तंत्र आणि तंत्रज्ञांचा वापर करून २.० बनवण्यात आला आहे. जवळपास ७५ मिलियन डॉलर खर्च करून हा चित्रपट बनवला आहे. दिग्दर्शक शंकर आणि त्याची टीम चित्रपटासाठी उत्सूक आहे. तर अक्षयचे चाहते त्याने असा रोल करायला नको हवा होता, असं बोलून त्याच्यावर नाराज झाले आहेत. १० भाषांमध्ये चित्रपट डब केला जाणार आहे. सुरुवातीला तामिळ आणि हिंदी त्यानंतर इतर भाषांमध्ये रिलिज होणार आहे. निर्माता करण जौहर आणि अनिल थडानी यांची कंपनी २.० रिलिज करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -