घरIPL 2020IPL 2020 : तेव्हाच मी सॅमसनला म्हणालो होतो, तू पुढचा धोनी होशील - शशी...

IPL 2020 : तेव्हाच मी सॅमसनला म्हणालो होतो, तू पुढचा धोनी होशील – शशी थरूर

Subscribe

सॅमसनने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ८५ धावांची खेळी केली.   

राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने यंदाच्या आयपीएल मोसमात सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने या मोसमाच्या सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध ३२ चेंडूत ९ षटकारांच्या सहाय्याने ७४ धावांची खेळी केली होती. तर रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ४२ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८५ धावा करत राजस्थानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे या सामन्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सॅमसनचे कौतुक केले. थरूर हे केरळ क्रिकेट आणि सॅमसनला नेहमीच पाठिंबा दर्शवत असतात.

वर्ल्ड क्लास खेळाडू पुढे आला

‘राजस्थानचा रॉयल्स संघाने उत्कृष्ट विजय मिळवला. मी संजू सॅमसनला दशकभरापासून ओळखत आहे आणि तो १४ वर्षांचा होता, तेव्हाच मी त्याला म्हणालो होतो की, एके दिवशी तू पुढचा महेंद्रसिंग धोनी होशील. तो दिवस आता आला आहे. आयपीएल स्पर्धेत दोन अप्रतिम खेळींनंतर एक वर्ल्ड क्लास खेळाडू पुढे आला आहे,’ असे थरूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले. रविवारी झालेल्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाब संघावर ४ विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात पंजाबने राजस्थानपुढे २२४ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना सॅमसनने ८५ धावांची खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे त्याने सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -