घरक्रीडान्यूझीलंडच्या फलंदाजांची कमाल, एका ओव्हरमध्ये ४३ धावा

न्यूझीलंडच्या फलंदाजांची कमाल, एका ओव्हरमध्ये ४३ धावा

Subscribe

न्यूझीलंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये ४३ धावा फटकावण्याचा विक्रम झाला आहे.

हल्ली क्रिकेटमध्ये फलंदाजांचे गोलंदाजांवर वर्चस्व असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. मग ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, आयपीएल असो की स्थानिक क्रिकेट. दर दिवशी फलंदाजांचे नवनवे विक्रम समोर येत असतात. असाच एक विक्रम आता न्यूझीलंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये झाला आहे. इथे झालेल्या सामन्यात नॉर्थन डिस्ट्रिक्टसच्या फलंदाजांनी सेंट्रल डिस्ट्रिक्टसच्या गोलंदाजाच्या एकाच षटकात ४३ धावा करण्याचा विक्रम केला.

ल्यूडीकच्या ९ षटकांत ४२ तर एकाच षटकात ४३ धावा 

न्यूझीलंडच्या स्थानिक क्रिकेटमधील वनडे स्पर्धा ‘फोर्ड ट्रॉफी’ मध्ये नॉर्थन डिस्ट्रिक्टस संघाच्या जो कार्टर आणि ब्रेट हॅम्पटन या दोन फलंदाजांनी मिळून सेंट्रल डिस्ट्रिक्टसचा गोलंदाज विलियम ल्यूडीकच्या एकाच षटकात ४३ धावा करण्याचा विक्रम केला. या दोघांनी ल्यूडीकच्या या षटकात ६ षटकार लगावले. स्थानिक क्रिकेटमधील ही एका षटकातील सर्वोच्च धावसंख्या आहे. ल्यूडीकचे हे षटक काहीसे असे दिसले- ४,६(+नो बॉल),६(+नो बॉल),६,१,६,६,६. ल्यूडीकने या षटकाआधी ९ षटकांमध्ये अवघ्या ४२ धावा दिल्या होत्या आणि अखेरच्या षटकात त्याने ४३ धावा दिल्या. याआधी स्थानिक क्रिकेटमध्ये एका षटकातील सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम झिम्बाब्वेच्या एल्टन चिंगमबुराच्या नावावर होता. त्याने बांगलादेशमधील स्थानिक क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या अलाउद्दीन बाबूच्या एकाच षटकात ३९ धावा काढल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -