घरमुंबईमाहुलवासीयांनी साजरी केली काळी दिवाळी

माहुलवासीयांनी साजरी केली काळी दिवाळी

Subscribe

प्रदूषणामुळे प्रकल्पग्रस्तांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशांची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने मागील रविवारपासून सतत दहा दिवस आंदोलन सुरु आहे.

सध्या सगळीकडे दिवाळीची धुम सुरू आहे. मात्र, दुसरीकडे प्रकल्पग्रस्त माहुलवासीयांनी काळी दिवाळी साजरी केली आहे. पुनर्वसन होईपर्यंत आम्ही दिवाळी साजरी करणार नसल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. शहरातील प्रकल्पग्रस्तांचे माहुलमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील प्रदूषणामुळे प्रकल्पग्रस्तांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने मागील रविवारपासून सतत दहा दिवस आंदोलन सुरु आहे. याकडे सरकार आणि महापालिका दुर्लक्ष करत असल्याने विद्याविहार तानसा पाईपलाईन येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी काळे कंदील लावून दिवाळी साजरी करण्यात आली आहे.

हेही वाचा – माहुलवासीयांना मिळणार म्हाडाची ३०० घरे

- Advertisement -

माहुल वासियांचे आंदोलन सुरुच

मुंबईतील विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरणामध्ये आणि तानसा जलवाहिनीमध्ये विस्थापितांना चेंबूरमधील माहुल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु येथील रासायनिक आणि तेलशुद्धीकरण कंपन्यांमुळे नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे तेथून दुसरीकडे स्थलांतरण करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. यासाठी त्यांनी सतत आंदोलन सुरु ठेवले आहे. परंतु, तरीही प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे यावर्षी माहुल वासियांनी काळी दिवाळी साजरी केली आहे. माहुल परिसरात रिफायनरी प्रकल्प असल्यामुळे तेथील बहुसंख्य नागरिकांना श्वसनाचे विकार उद्भवत आहेत. कित्येक नागरिकांकडून रिफायनरी प्रकल्प बंद व्हावा, म्हणून आंदोलने केले जात आहे. त्याचबरोबर मुंबईतील विविध प्रकल्पबाधित नागरिकांना माहुलला स्थलांतरित करण्यात आले आहे. या प्रकल्पबाधित नागरिकांनीही आपले स्थलांतरण दुसरीकडे व्हावी, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती. उच्च न्यायाने त्यांचे पूनर्वसन दुसरीकडे करावे, असे आदेश दिले होते. परंतु, प्रशासन उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करताना दिसत नाही.


हेही वाचा – माहुल ज्वालामुखीच्या तोंडावर !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -