RR vs RCB Live Update : RCB चा विजय

आज आयपीएलमध्ये राजस्थान विरुद्ध बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. 

एबी डिव्हिलियर्स

बंगळुरूचा हा नऊ सामन्यांत सहावा विजय ठरला.


अखेरच्या षटकांमध्ये एबी डिव्हिलियर्सने केलेल्या फटकेबाजीमुळे (२२ चेंडूत नाबाद ५५) बंगळुरूने सामना जिंकला.


पडिक्कलला (३५) राहुल तेवातियाने, तर कोहलीला (४३) कार्तिक त्यागीने बाद केले.


देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी रचली.


बंगळुरूची अडखळती सुरुवात. सलामीवीर फिंच १४ धावांवर बाद. श्रेयस गोपाळने घेतली विकेट.


स्मिथ (५७) आणि राहुल तेवातिया (नाबाद १९) यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने २० षटकांत ६ बाद १७७ अशी धावसंख्या उभारली.


बटलर २४ धावांवर बाद झाला.


कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि बटलर यांनी राजस्थानला सावरले.


राजस्थानने तीन विकेट झटपट गमावल्या. स्टोक्सला (१५) मॉरिसने, तर उथप्पा (४१) आणि सॅमसन (९) यांना चहलने बाद केले.


पॉवर-प्लेच्या ६ षटकांनंतर राजस्थानची १ बाद ५२ अशी धावसंख्या. उथप्पा १६ चेंडूत ३२ धावांवर नाबाद.


बेन स्टोक्स १५ धावांवर बाद. त्याला क्रिस मॉरिसने बाद केले.


रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्स या सलामीवीरांनी राजस्थानच्या डावाची आक्रमक सुरुवात केली.


राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना होत आहे.