घरक्रीडाUS OPEN : सेरेना विल्यम्स उपांत्यपूर्व फेरीत

US OPEN : सेरेना विल्यम्स उपांत्यपूर्व फेरीत

Subscribe

सेरेना या स्पर्धेत आपल्या २४ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या शोधात आहे.

अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिसऱ्या सीडेड सेरेनाने चौथ्या फेरीच्या सामन्यात ग्रीसच्या मारिया सक्कारीचा ६-३, ६-७, ६-३ असा पराभव केला. सेरेना या स्पर्धेत आपल्या २४ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या शोधात आहे. तिला यंदाची स्पर्धा जिंकण्यात यश आल्यास ती मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी (२४) बरोबरी करेल.

सक्कारीची चांगली झुंज

चौथ्या फेरीच्या सामन्यात ३८ वर्षीय सेरेनाला २५ वर्षीय सक्कारीने चांगली झुंज दिली. सेरेनाने पहिला सेट ६-३ असा जिंकला, पण दुसऱ्या सेटमध्ये सक्कारीने पुनरागमन केले. ६-६ अशी बरोबरी झाल्याने हा सेट टायब्रेकरमध्ये गेला, ज्यात सक्कारीने ८-६ अशी बाजी मारली. तिसऱ्या सेटमध्ये मात्र सेरेनाने पुन्हा तिचा खेळ उंचावला आणि हा सेट ६-३ असा जिंकत सामनाही जिंकला.

- Advertisement -

डॉमिनिक थीमची आगेकूच

दुसऱ्या सीडेड डॉमिनिक थीमला पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. त्याने कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलिआसिमेवर ७-६, ६-१, ६-१ अशी मात करत स्पर्धेत आगेकूच केली. तसेच तिसऱ्या सीडेड डॅनिल मेदवेदेव्हने अमेरिकेच्या फ्रॅन्सिस टियाफोचा ६-४, ६-१, ६-० असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -