घरक्रीडाIPL : युएईत क्वारंटाईनमध्ये राहणे होते अवघड - मोहम्मद शमी

IPL : युएईत क्वारंटाईनमध्ये राहणे होते अवघड – मोहम्मद शमी

Subscribe

शमी लॉकडाऊनच्या काळात घरीच सराव करत होता.  

कोरोनामुळे भारतात मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना घरातच बसून राहावे लागले आहे. मात्र, या काळातही वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याचा सराव सुरु ठेवला होता. आता या मेहनतीचा लवकरच सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत फायदा होईल अशी शमीला आशा आहे. तसेच चार महिने घरी राहण्यापेक्षाही युएईत सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहणे मला अवघड गेले आहे, असे शमी म्हणाला.

सहा दिवस काहीही करता आले नाही

मागील चार महिन्यांचा काळ हा सर्वांसाठीच अवघड गेला, मग तो खेळाडू असो की सामान्य माणूस. नशिबाने माझ्या घरी क्रिकेटचा सराव सुरु ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध होती. आता युएईत दाखल होऊन सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहणे मला खूप अवघड गेले. हे सहा दिवस मागील चार महिन्यांहून अवघड होते असे मी म्हणीन. याचे कारण म्हणजे, चार महिन्यांच्या काळात मी सराव करत होतो, गरजुंना मदत करत होतो. मात्र, युएईत आल्यावर सहा दिवस मला काहीही करता आले नाही. आता पुन्हा मैदानावर उतरून क्रिकेट खेळण्यास मी आतुर आहे. लॉकडाऊनच्या काळातही मी घेतलेली मेहनत मला आता उपयोगी पडत आहे, असे शमीने सांगितले. शमी आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -