घरक्रीडाटी-२० वर्ल्डकपसाठी संघ बांधणीचा प्रयत्न!

टी-२० वर्ल्डकपसाठी संघ बांधणीचा प्रयत्न!

Subscribe

पुढील वर्षी होणार्‍या टी-२० विश्वचषकासाठी आम्ही संघ बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करत आहे. मात्र, भारत आता पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषकाचाही विचार करत आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघ राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या युवा खेळाडूंना सातत्याने संधी देत आहे. मात्र, संघ बांधणी करत असताना जिंकत राहणेही महत्त्वाचे आहे, असे कोहलीला वाटते.

२०२० मध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषकावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आता या स्पर्धेला १२ महिनेच शिल्लक असून आम्ही हा विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून संघ बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आगामी काळात होणार्‍या टी-२० सामन्यांमध्ये आमचे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करत आपले संघातील स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करतील याची मला खात्री आहे. या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी आम्हाला आमचा सर्वोत्तम संघ माहीत असणे आवश्यक आहे, असे कोहलीने सांगितले.

- Advertisement -

भारतीय महिला वर्ल्डकप जिंकल्यास आनंद!

पुढील वर्षी पुरुष टी-२० विश्वचषकाआधी महिला टी-२० विश्वचषकही होणार आहे. भारताने हा विश्वचषक जिंकल्यास विराट कोहलीला आनंद होईल. भारताला टी-२० विश्वचषक जिंकवून देणारा तिसरा भारतीय कर्णधार व्हायला आवडेल, असे कोहली म्हणाला. भारताने २००७ मध्ये झालेला पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. टी-२० क्रिकेट इतके लोकप्रिय होईल असे त्यावेळी कोणालाही वाटले नसावे. त्यामुळे भारताला टी-२० विश्वचषक जिंकवून देणारा दुसरा कर्णधार व्हायला मला आवडेल. मात्र, त्याआधी २०२० मध्येच महिला विश्वचषकही होणार आहे. भारतीय महिलांना जेतेपद पटकावण्यात यश आले तर मला आनंद होईल. भारताला टी-२० विश्वचषक जिंकवून देणारा तिसरा भारतीय कर्णधार व्हायला मला जास्त आवडेल, असे कोहली म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -