आता ‘विमेन्स टी-२० चॅलेंज’ स्पर्धा रंगणार; BCCI ने वेळापत्रक केलं जाहीर

The BCCI announces squads and timetable for women’s T20 Challenge
'विमेन्स टी-२० चॅलेंज' स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

कोरोनाच्या धर्तीवर पुरुषांची आयपीएल स्पर्धा (IPL 2020) यूएईमध्ये सुरु असताना आता महिलांची देखील ‘विमेन्स टी-२० चॅलेंज’ स्पर्धा होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिलांच्या ‘विमेन्स टी-२० चॅलेंज’ स्पर्धेचं वेळापत्रक जारी केलं असून या स्पर्धेसाठा तीन संघांची घोषणा केली आहे. मिताली राज (Mithali Raj), हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि स्मृती मंधाना यांच्याकडे या तीन संघांच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळायला दिली आहे. हरमनप्रीत कौर सुपरनोव्हासची कर्णधार असेल. ट्रेलब्लेझरची कर्णधार स्मृती मंधाना, तर मिताली राज हिला व्हेलॉसिटी संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही स्पर्धा ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) खेळवली जाणार आहे.

रविवारी बीसीसीआयने एक प्रेस नोट प्रसिद्ध करत या स्पर्धेचे वेळापत्रक आणि संघांची माहिती दिली. तिन्ही संघात प्रत्येकी १५ सदस्य आहेत. स्पर्धेचा पहिला सामना ४ नोव्हेंबरला सुपरनोवेज आणि व्हेलॉसिटी यांच्यात होणार आहे. ९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि न्यूझीलंडमधील महिला खेळाडूही भाग घेतील. या सर्व देशांव्यतिरिक्त थायलंडचा नट्टाहाकन चंथममही यात भाग घेणार आहे, जी टी -२० विश्वचषकात अर्धशतक झळकावणारी आपल्या देशाची पहिली क्रिकेटपटू ठरली.

संघ

सुपरनोवास: हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमीमा रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अट्टाप्पट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), शशीकला सिरीवर्धने, पूनम यादव, शकीरा सलमान, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकर, आयूषी सोनी, आयाबोंगा खाका आणि मुस्कान मलिक.

ट्रेलब्लेझर: स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पूनम राऊत, रीचा घोष, डी हेमलता, नुजत परवीन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी इक्सलेस्टोन, नट्टाहाकन चंथम, डेंद्रा डॉटिन, काश्वी गौतम.

व्हेलॉसिटी: मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य, सुश्री दिव्यदर्शिनी, मनाली दक्षिणी, लेह कॅसपेरेक, डॅनियल व्याट, सुने लूस, जहानारा आलम, एम. अनघा


हेही वाचा – IPL 2020: तर सुनिल नरिनच्या गोलंदाजीवर येणार बंदी