घरक्रीडाकोहलीने केला स्वतःचा पहिला स्नीकर लाँच

कोहलीने केला स्वतःचा पहिला स्नीकर लाँच

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्वतःचा पहिला स्नीकर (बूट) लाँच केला आहे. या स्नीकरचे नाव वन८ (one8)असे ठेवण्यात आले आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या मैदानात नवनवे विक्रम रचत असतो. पण मैदानाबाहेरही तो नवे प्रयोग करायला घाबरत नाही. त्याने दसऱ्यानिमित्त स्वतःचा नवा स्नीकर लाँच केला आहे. तो प्युमा या स्पोर्ट्सवेअर ब्रॅण्डशी जोडलेला आहे. कोहलीच्या या स्नीकरचे नाव वन८ (one8) असे ठेवण्यात आले आहे. या स्नीकरची कल्पना कोहलीच्याच डोक्यातून आली आहे.

भारतात खेळाडूंनी स्वतःचे स्नीकर किंवा शूज लाँच करणे ही संकल्पना नवी असली तरी अमेरिकेत ही संकल्पना फार जुनी आहे. अमेरिकेचा महान बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन याच्या नावाने एअर जॉर्डन ही कंपनी आहे. जी शूज आणि कपडे बनवते. ही कंपनी स्पोर्ट्सवेअर ब्रॅण्ड नायकीशी जोडलेली आहे. नायकीने सर्वात पहिला जॉर्डन शू १९८४ मध्ये लाँच केला होता.

- Advertisement -
मायकल जॉर्डन (सौ-manyofmany.com)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -